(जीवन साधना)
मकर – (भो, जा, जी, खी, खू, खा, खो, गा, गी)
राशीस्वामी – शनी
भाग्यांक – १
लकी रंग – काळा
भाग्यदिन – शनिवार
लाभणारं रत्न – नीलम
मकर रास एक ज्योतिष राशी आहे. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. मकर रास ही दहाव्या भागात येते, म्हणून ही राशी कुंडलीत १० या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये उत्तराषाढा नक्षत्राचे चारापैकी शेवटचे तीन चरण(भाग) श्रवण हे संपूर्ण नक्षत्र आणि धनिष्ठा नक्षत्राचे पहिले दोन चरण येतात. नऊ ग्रहांमध्ये शनीचे स्थान सर्वात वेगळे आहे. हा ग्रहांचा न्यायाधीश आहे. मकर राशीचा स्वामी शनी आहे. यामुळे मकर राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहते. या राशीचे लोक आत्मविश्वासाने भरलेले राहतात. शनिदेव यांना उत्तम नेतृत्व क्षमता प्रदान करतात. अथक परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर या व्यक्ती प्रत्येक कामात यशस्वी होतात.
मकर राशीचे चिन्ह मगर आहे. मकर लग्न असणारे लोक खूप मेहनती असतात. त्यांचा स्वभाव कठोर असतो. कोणाकडे लक्ष देण्याआधी हे स्वतःचे हित पाहतात. जीवनात येणाऱ्या संकटांना न घाबरता लढण्याची हिम्मत यांच्यात असते. मकर राशीचा स्वामी शनिच्या अधिपत्याखाली असल्याने या राशीचे लोक खूप शिस्तप्रिय असतात. एकदा एखादं काम हाती घेतलं की ते पूर्ण झाल्याशिवाय ते अजिबात थांबत नाहीत. मकर राशीचं चिन्ह आहे मकर किंवा शिंगवाला बोकड आहे. हिंदू पुराणांमध्ये मकर हा समुद्री प्राणी असल्याचाही उल्लेख आहे. या प्राण्याचा पुढचा भाग बकऱ्यासारखा आणि उरलेला एखादा मासा, मगरीसारख्या जलचरासारखा असतो. मकर राशीचे लोक मकर राशीचे लोक सडपातळ आणि कमी वजनाचे असतात. तर उंची सर्वसाधारण असते.
या राशीचे लोक खोल विचार करणारे असतात. त्यांच्या बोलक्या स्वभावामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात येतात. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजतात. याशिवाय या राशीचे लोक दृढनिश्चयी आणि महत्त्वाकांक्षी असतात. संशय ही त्यांची नकारात्मक बाजू आहे. या राशीत जन्मलेले लोक विद्वान, इतरांवर टीका करणारे, संगीतकार, आईचे प्रिय, श्रीमंत, त्यागी, दयाळू, आनंदासाठी अधिक विचार करणारे असू शकतात.
मकर राशीच्या व्यक्ती आत्मकेंद्री असण्याची शक्यता असते. या राशीच्या व्यक्ती खूप हट्टी असतात. याशिवाय मकरेच्या व्यक्ती खूप महत्त्वाकांक्षी, गंभीर आणि कामाच्या बाबतीत खूपच झोकून देऊन काम करणाऱ्या असतात. या राशीच्या व्यक्तींची स्मरणशक्ती खूप चांगली असते. अर्थविषयक काही गोष्ट निघाली की त्यांचे डोळे आणि कान टवकारले जातात आणि आर्तेथिक बाबतील ते खूप काळजीपूर्वक पावलं उचलतात. मकरेच्या व्यक्तींना त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य यांची जाण असते. त्यातूनच ते त्यांचं काम अत्यंत चिकाटीने आणि मन लावून करतात.
मकरेच्या व्यक्ती खूप लवकर वैतागतात. त्यांच्या वागण्यात थोडाफार उर्मटपणाही दिसतो. घाईघाईने काम करणं हासुद्धा त्यांच्या स्वभावाचा दोष मानला जातो. मकर राशीच्या व्यक्तींचा शैक्षणिक क्षेत्राकडे ओढा असतो. या व्यक्ती अभ्यासात पुढे असतात. व्यवसायाचा विचार केला तर मकरेच्या व्यक्तींना विमा उद्योग, मशिनरी, काँट्रॅक्टिंग, इलेक्ट्रिसिटी, बेटिंग या क्षेत्रात यश मिळू शकतं.
या राशिच्या लोकांना वेळेवर जेवण करणेच लाभदायक ठरणार आहे. वात पोटाचे आजार चर्म रोग डोळ्यांत कमजोरी मधुमेह दातांचे विकार यांपैकी एक किंवा दोन आजार होण्याची शक्यता असते. यांना जीवनात एकदातरी टायफाईड होत असतो किंवा पडल्यामुळे खोलवर जखम होण्याची किंवा हाडे तुटण्याची शक्यता आहे. शक्यतो या राशिचे लोक आजारी पडत नाहीत. मात्र आजारी पडले तर जास्त काळ आजारी पडतात. तर आजारी पडल्यावर मनाने जास्त घाबरतात. घरात जरी कोणी आजारी पडले तरी ते अस्वस्थ होतात, त्यामुळे त्याचे कामात लक्ष लागत नाही. त्वचेच्या रोगांपासुन या राशिच्या लोकांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. थंड व ज्यापासून वायु निर्माण होतो अशा पेयांचे सेवन न करणेच उचित. नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे.
मकर राशीचे बहुतेक लोक प्रेमात भाग्यवान ठरतात. या राशीच्या व्यक्ती त्यांच्या जोडीदाराला सर्वस्व अर्पण करणाऱ्या असतात. पण काही मकर व्यक्ती एकट्याच राहतात. मकर व्यक्तींचं कौटुंबिक आयुष्य बरंच खाचखळग्यांचं असं अवघड असतं. त्यांना अनेक आव्हानं पेलावी लागतात. पण त्यांच्या वैवाहित आयुष्याचा विचार केला तर ते सुखी असतात, आनंदी असतात. मकर राशीच्या व्यक्तींची तूळ, मिथुन, कन्या, वृषभ आणि कुंभ राशीच्या व्यक्तींशी मैत्री होते. कर्क, सिंह आणि वृश्चिक राशीशी मात्र यांचं वैर असतं.
मकर राशिच्या लोकांसाठी वृषभ, कन्या व मकर राशीच्या व्यक्ती योग्य जीवनसाथी ठरतात. या लोकांच्या दृष्टीने विवाह हा सुरक्षा तसेच एकतेचे प्रतिक आहे. ते जीवनात आनंद देणारी प्रसंन्नता आणणारा जीवनसाथी शोधत असतात. विवाह व प्रेम हेच यांच्यासाठी जीवनाप्रमाणे आहे. यांच्या जीवनात आपला जीवनसाथी व मित्रांसाठी महत्वपूर्ण स्थान असते. यांना बायको कार्यकुशल व चतुर मिळते. यामुळे यांचे संसारीक जीवन सुखी होते. घराची पूर्ण जवाबदारी यांची पत्नी संभाळते. त्यामुळे हे लोक आरामात जीवन जगतात.
मकर राशिच्या लोकांचा शनि या ग्रहाशी जास्त जवळीक असल्यामुळे या राशिच्या लोकांचा शनिवार हा भाग्यशाली दिवस असतो. या दिवशी या लोकांमध्ये विशेष स्वरूपात उत्साह असतो. याशिवाय रविवार व शुक्रवार हे दिवससुध्दा शुभ आहेत, सोमवार हा मध्यम स्वरूपाचा तर मंगळ व गुरूवार हे अशुभ दिवस आहेत. ज्या दिवशी तुळा राशिच्या चद्राचा प्रभाव असेल त्या दिवशी या राशिच्या लोकांनी कोणत्याही महत्वपूर्ण कामांना सुरूवात करू नये. मकर राशिचे लोकांना 1 हा अंक भाग्यशाली आहे. 1, 10, 28, 37, 46, 55, 64, 73…. इत्यादी तसेच 4 व 8 हे अंकही त्यांच्यासाठी शुभ आहेत 3 व 7 हे अंक सम आहेत तर 1, 2 व 9 हे अंक अशुभ आहेत. जर आपण या अंकांची शुभाशुभता लक्षात घेतली तर आपल्याला नक्कीच यश येईल.
मकर राशी थोडक्यात :
- मकर राशीचा स्वामी शनि आहे. ती दक्षिण दिशेची स्वामी आहे. यांचा स्वभाव उच्च दर्जाचा असतो.
- मकर राशीचे प्रतीक मगर आहे. या राशीचे लोक खूप महत्वाकांक्षी असतात. आदर आणि यश मिळवण्यासाठी ते सतत काम करत असतात.
- यांचा स्वभाव राजेशाही तर गंभीर व्यक्तिमत्व असते. मात्र उद्दिष्टे साध्य करण्यासाठी यांना खूप कष्ट करावे लागतात. यांच्या गंभीर स्वभावामुळे तो सहजासहजी मैत्री करत नाही. त्यांचे मित्र बहुतेक फक्त ऑफिस किंवा व्यवसायाशी संबंधित असतात.
- या व्यक्ती देव आणि नशिबावर जास्त विश्वास ठेवतात. तीव्र आवडी-निवडीमुळे त्यांचे वैवाहिक जीवन लवचिक नसते आणि जीवन साथीदाराला याचा त्रास होत असतो.
- मकर राशीची मुले कमी बोलकी असतात. त्यांच्या हाताची पकड खूप मजबूत असते. दिसायला सुस्त, पण मानसिकदृष्ट्या खूप चलाख व चपळ असतात
- यांचे मौनच जोडीदाराला जास्त प्रिय असते. जर यांच्या लाइफ पार्टनरला त्यांचे वागणे चांगले समजले तरच यांचे आयुष्य आनंदाने व्यतीत होते.
- या राशीच्या व्यक्ती जीवनसाथी किंवा मित्रांच्या मदतीने चांगली प्रगती करू शकतात.
- मकर राशीच्या मुली शक्यतो उंच आणि सडपातळ असतात. या महिला करिअरसाठी बहुतांश वेळ घालवत असतात.
- या राशी कुटुंबाच्या सुखासाठी कोणतीही जोखीम स्वीकारण्यास सज्ज राहतात.
(Source : विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/धार्मिक श्रद्धा-शास्त्रातील संकलित माहिती)