(जीवन साधना)
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. ती उत्तर दिशेची स्वामी आहे. यांचा स्वभाव स्पष्ट, शुद्ध, दृढनिश्चयी, हट्टी आणि गर्विष्ठ असतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म योग्य वेळी, तारखेला आणि वर्षात होत असतो. प्रत्येक महिन्यात जन्म घेणारी व्यक्ती ही वेगळ्या राशीची असते. जन्मदिवसानुसार त्या त्या व्यक्तीची रास, त्याचा स्वभाव, त्याचे गुण ठरतात. आज वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत अधिक माहिती जाणून घेऊया.
वृश्चिक – (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)
राशी स्वरूप – विंचू
राशी स्वामी – मंगळ.
भाग्यांक – 9
लकी रंग – लाल, तांबडा
भाग्यदिन – मंगळवार
लाभणारं रत्न – पोवळे
वृश्चिक रास ही आठव्या भागात येते, म्हणून ही राशी कुंडलीत ८ या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये विशाखा नक्षत्राच्या चारापैकी चौथा चरण(भाग), आणि अनुराधा व ज्येष्ठा ही संपूर्ण नक्षत्रे येतात. या राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाचा अंमल आहे. ही जलतत्त्वाची आणि स्थिरस्वभावाची आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. ते त्यांच्या भावना लपवून ठेवतात, म्हणून त्यांना समजणे थोडे कठीण असते. ते संतप्त, उत्साही आणि पराक्रमी असतात. या राशीचे लोक प्रेमात नेहमी गोंधळलेल्या स्थितीत असतात. त्यांची विनोदबुद्धी अप्रतिम असते, तर ते त्यांच्या कामात अतिशय कुशल असतात. या व्यतिरिक्त या राशीचे लोक एकाग्र होण्यास परिपूर्ण असतात.
वृश्चिक राशीचे लोक स्वभावाने खूप अंतर्मुख असतात. त्यांचे मन जाणणे सोपे नाही. हे लोक त्यांच्या प्राधान्यक्रमाशी कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाहीत. हे लोक स्वभावाने अतिशय कठोर असतात आणि त्यांना इतरांच्या भावनांची पर्वा नसते. या राशीच्या लोकांचा स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असतो. इतर त्यांच्याबद्दल काय विचार करतात याची त्यांना पर्वा नसते. स्वभावाने हे गंभीर, निर्भय, जिद्दी आणि भावनिक असतात. त्यांना आपलं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायला आवडतं. या राशीचे लोक हे अत्यंत मेहनती मानले जातात. कोणतेही काम करताना ते अगदी मनापासून करतात आणि आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी खूप झटतात.
वृश्चिक राशीचे लोक कर्तृत्ववान असतात, परंतु ते वारंवार अवाजवी खर्च करतात. एकाच वेळी अनेक गोष्टी घडवून आणण्यावर त्यांचा गाढा विश्वास असतो. यामुळेच अपूर्ण कामांबाबत ते तणावात राहतात. त्यांच्यासाठी जीवनात व्यस्त राहणे, कामात अडकणे आणि धावपळ करणे हे सर्व गृहीत असते. या राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा राहते असे म्हटले जाते. या राशीच्या लोकांनी मंगळवारी पूजा केली तर त्यांच्या सर्व कामांमध्ये यश मिळते. त्याचबरोबर त्यांची आर्थिक स्थितीही मजबूत होते.
राशीचक्रातली ही आठवी रास प्रेमासाठी आतुर असते. आपण करतो तसं प्रेम जसंच्या तसं आपल्याला मिळावं अशी त्यांची अपेक्षा असते. एकाच वेळी ते खूप रोमँटिक असतात आणि भावनिकही होतात. या राशीचे लोक आपल्या जोडीदाराला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध युक्त्या लढवतात. या लोकांना स्वच्छंदी राहायला आवडते, पण जेव्हा त्यांचा जोडीदार असे वागू लागतो तेव्हा मात्र यांना ते रुचत नाही. वृश्चिक राशीच्या लोकांना आपल्या जोडीदाराकडून सर्वोत्तम समाधानाची अपेक्षा असते. त्यांच्या अपेक्षेएवढं प्रेम जोडीदाराने नाही दिलं तर नातं तोडायचाही विचार वृश्चिकेचे लोक करू शकतात. याच स्वभावामुळे त्यांचे आप्त आणि नातेवाईक यांच्याबरोबरसुद्धा जिव्हाळा टिकू शकत नाही. कर्क, सिंह, मेष, मकर आणि मीन या राशींशी वृश्चिक राशीचं चांगलं जमू शकतं. पण मिथुन आणि कन्या राशीच्या मैत्रीपासून सावध राहावं.
मेष राशीप्रमाणे वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळामुळे या राशीचे लोक धाडसी असतात. या राशीचे लोक कोणत्याही कामामध्ये रिस्क घेण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. मात्र आपले काम प्रामाणिकपणे व जबाबदारीने करत राहतात. कष्टाच्या जोरावर इतर राशींपेक्षा हि राशी जास्त ताकदवान मानली जाते. हे लोक उत्तम योजनाकार असतात. आपल्या योजनांमध्ये चांगले यशस्वी होतात. वृश्चिक राशीच्या लोकांचा सर्वांत मोठा दोष म्हणजे ते आपले धैर्य उघडपणे दाखवण्यास घाबरतात. वरवर शांत दिसत असले तरी या लोकांच्या मनात बदला घेण्याची खुमखुमी असते आणि जेव्हा वेळ येते तेव्हा ते थेट शत्रूवर तुटून पडण्यास कचरत नाहीत.
वृश्चिक कोणासमोरही आपल्या मनातील गोष्टी न सांगणे व स्वतः साठी अनुकल असलेल्या संधीच्या शोधात असणे हा या लोकांचा मुख्य स्वभाव गुण आहे. यांच्या स्वभावात थोडा कडूपणा असतो. स्वभावात उग्रता असल्याने त्यांची नेतृत्व शक्तीही चांगली असते. वृश्चिक राशीच्या लोकांना वैद्यकीय, ज्योतिष, विज्ञान, व्यवस्थापन, वाणिज्य आणि राजकीय क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता मोठी असते. व्यवसायांचा विचार केला तर वैद्यकीय उपकरणं, इलेक्ट्रिकल्स वगैरे खरेदी विक्रीच्या व्यवसायात यांना चांगला जम बसवता येतो.
वृश्चिक राशी थोडक्यात
- वृश्चिक राशीचे चिन्ह विंचू आहे आणि ही राशी उत्तर दिशा दर्शवते. वृश्चिक ही जल तत्वाची राशी आहे
- या राशीचे लोक उच्च विचाराचे असतात. या लोकांना अनेकदा अॅलर्जीचा त्रासही जाणवतो.
- वृश्चिक लोकांमध्ये इतरांना आकर्षित करण्याची चांगली क्षमता असते. या राशीचे लोक धाडसी, तापट तसेच कामुक असतात.
- यांची शारीरिक रचना देखील चांगली आहे. यांचे खांदे रुंद असतात. त्यांच्याकडे खूप शारीरिक आणि मानसिक ताकद चांगली असते. यांची बोलण्याची एक खास शैली असते.
- या व्यक्ती सर्वांमध्ये मिसळू शकत नाहीत. हे लोक स्वतःहुन इतरांच्या मध्ये-मध्ये करत नाहीत किंवा कोणाला अडवणूक करणार नाहीत पण यांना जर कोणी त्रास देत असेल तर त्याला सहजपणे सोडत नाहीत.
- यांना मूर्ख बनवणे सोपे नाही. ते नेहमी स्पष्ट आणि योग्य सल्ला देणाऱ्यावर विश्वास ठेवतात. काहीवेळा स्पष्टवक्तेपणा देखील त्यांचे विरोधाचे कारण बनू शकते.
- हे लोक विविधतेच्या शोधात असतात. वृश्चिक राशीची मुले फार कमी बोलतात. या राशीच्या मुली शक्यतो सडपातळ असतात.
- विंचू राशी एक जबाबदार गृहस्थाची भूमिका बजावतात. हे अतिशय महत्त्वाकांक्षी आणि जिद्द असतात, यांना स्वतःच्या मार्गाने जायला आवडते, मात्र कोणाचा हस्तक्षेप आवडत नाही.
- लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी हे खूप लक्षात ठेवतात आणि वेळ आल्यावर त्यांना त्याप्रमाणे उत्तरही देतात. यांचे बोलणे कडू आणि राग तीव्र असतो, पण मन स्वच्छ असते. यांना इतरांचे दोष शोधण्याची वाईट सवय असते. हेराफेरीच्या राजकारणात ते कमालीचे हुशार असतात.
- हे लोक बुद्धिमान आणि भावनिक असतात. त्यांची इच्छाशक्ती खूप प्रबळ असते. या राशीच्या स्त्रिया हट्टी आणि खूप महत्वाकांक्षी असतात. तर काही वेळा स्वार्थी प्रवृत्तीही दिसून येते.
- स्वतंत्र निर्णय घेणे त्यांच्या सवयीचे असते. मात्र या लोकांची काम करण्याची क्षमता अचाट असते.
- वृश्चिक राशीच्या मुलांना कुटुंबाबद्दल अधिक आपुलकी असते. संगणक आणि टीव्ही, मोबाईलमध्ये यांना खूप रस असतो.
- यांच्यामध्ये स्मरणशक्ती तीव्र असते आणि खेळामध्ये या राशीच्या मुलांना जास्त रुची असते
- मेष आणि वृश्चिक या मंगळाच्या दोन राशी. त्यापैकी वृश्चिक ही मंगळाची नाआवडती राशी, कारण वृश्चिक राशी ही स्त्री राशी आहे. वृश्चिकेच्या व्यक्ती ह्या एखाद्या timebomb प्रमाणे असतात. कधी फटकळ बोलतील याचा नेम नाही. पण या राशीचे लोक शिव्या शक्यतो देत नाहीत.
- बचावात्मक पवित्रा असला तरी गनिमीकावा करण्यात हे लोक हुशार असतात. समोरासमोर लढाई करण्यापेक्षा योग्य संधीची वाट पाहून हे लोक बरोबर काटा काढतात.
- वृश्चिक वाल्यानी शक्यतो वृश्चिक व्यक्तीसोबत लग्न करणे चांगले.
- आयुष्यात या व्यक्तींना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. प्रतिभा, पैसा आणि भाग्य यांची साथ देते.
- करिअरपासून ते अगदी नात्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत पॅशनशिवाय या व्यक्ती कामच करत नाहीत. यांच्यामध्ये असणारी ही पॅशनच त्यांना अपयश पचवायला मदत करते आणि अपयश मिळूनही यश मिळेपर्यंत या व्यक्ती प्रयत्न करत राहतात.
(Source : विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/धार्मिक श्रद्धा-शास्त्रातील संकलित माहिती)