(रत्नागिरी)
कामगार सहाय्यक संघ महाराष्ट्र राज्य संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी सुधीर वामने यांची 7 फेब्रुवारी रोजी निवड करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये संस्थेचे सभासद नोंदणी करून संस्थचे कार्यक्षेत्र वाढविण्याकरिता जिल्हा अध्यक्ष तसेच तालुका अध्यक्ष नेमणूक करण्यात आली.
रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी श्री. सुधीर वामने तर रत्नागिरी शहर अध्यक्ष पदी श्री. अनंत सावंत यांची निवड करण्यात आली. पुणे शहर अध्यक्ष पद श्री. विक्रांत जावकर यांची नेमणूक करण्यात आली असून या कार्यक्रमावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संपर्क प्रमुख श्री.प्रमोद कांबळे, कार्याध्यक्ष श्री. राजेंद्र कळंबटे, संघटक श्री. दीपक पवार, नवनिर्वाचित शहर अध्यक्ष श्री. अनंत सावंत, संस्था अध्यक्ष श्री.रमेश थोरात, पुणे शहर अध्यक्ष विक्रांत जावकर, संस्था सहसचिव गजानन जाधव रत्नागिरी अध्यक्ष श्री.सुधीर वामणे व संस्थेचे खजिनदार हणमंत ठोकळे व सचिव सुशांत सोनावले आदी मान्यवर उपस्थित होते.