( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
जिल्ह्यातील तरुण तरुणीना सशस्त्र सेनेमध्ये अधिकारीपदावर निवड होण्यासाठी विद्यार्थांना मार्गदर्शनाची गरज असते. जिल्ह्यातील तरुण तरुणी जास्तीत जास्त संख्येने सैन्यदलात भरती व्हावेत यासाठी
रत्नागिरीत मार्गदर्शन शिबिर होणार आहे. रविवार 5 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी 1 या वेळेत रत्नागिरीत हॉटेल विवेक येथे हे मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे.
शिबिरात सैन्यदलातील एनडीए, एनए, टीईएस इत्यादी प्रवेश परीक्षांविषयी परिपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी मराठा बिजनेसमन फोरमचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून, रिटायर्ड मेजर जनरल डॉ. विजय पवार उपस्थित राहणार आहेत.
यावेळी माजी मुख्य आयकर आयुक्त व एम्बीएफचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन अरुण पवार उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संबंधित संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा बिजनेसमन फोरमच्या रत्नागिरी चॅप्टरच्या वतीने आयोजकांनी केले आहे.