( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुक्यातील श्री माघी गणेशोत्सव मंडळ पाडावेवाडी, मिरजोळे आयोजित जिल्हास्तरीय बहुरंगी नमन स्पर्धेत रत्नागिरीतील रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ (लयभारी) या मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक श्री भैरवनाथ नमन मंडळ, रानपाट तर तृतीय क्रमांक स्वयंभू श्री महालक्ष्मी नाट्य नमन मंडळ कोतवडे यांनी प्राप्त केला.
माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पाडावेवाडी येथील श्री कालिका देवी नाट्य मंडळाच्या रंगमंचावर नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे माजी सभापती व मिरजोळे गट माजी सदस्य महेश उर्प बाबू म्हाप, मिरजोळे ग्रा.पं.सरपंच गजानन गुरव, ग्रा.पं.सदस्या सौ. पूनम पाडावे, कोकण नमन कलामंच रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पी.टी.कांबळे, श्रीधर खापरे (कोकण नमन कलामंच संस्थापक), माघी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दिपक गावकर, माजी सरपंच संदीप उर्प बावा नाचणकर, मिरजोळे येथील युवा कार्यकर्ते वैभव पाटील, सांस्कृतिक चळवळीतील आघाडीचे कलावंत व शिक्षक संतोष गार्डी, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र सांबरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या श्री काशिविश्वेश्वर लिंगायत नमन मंडळ, सांबवाडी-केळये (रत्नागिरी), श्री विठ्ठल रखुमाई खापरे-धनावडे नमन मंडळ करबुडे (रत्नागिरी), स्वयंभू श्री महालक्ष्मी नाट्य नमन मंडळ, कोतवडे, जाकादेवी नमन मंडळ, फणसवळे (कोंडवाडी), विश्वेश्वर नमन मंडळ, केळ्ये (ठिकवाडी), रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ, (लयभारी) रत्नागिरी, नवतरूण उत्कर्ष नमन मंडळ, ओरी बोरवाडी, रत्नागिरी, श्री गणेश कला नाट्य नमन मंडळ, कळझोंडी (वीरवाडी) रत्नागिरी, श्री भैरवनाथ नमन मंडळ, रानपाट रत्नागिरी यांनाही सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी परिक्षक मंडळ म्हणून महेश कांबळे (टिके, रत्नागिरी), विश्वनाथ गावडे (निवळी), मालप (रत्नागिरी), संतोष गार्डी (रत्नागिरी) यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या सादरीकरणाच्या अंतिम निकालात रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ (लयभारी) या मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. तर दुसरा कमांक श्री भैरवनाथ नमन मंडळ, रानपाट तर तृतीय कमांक स्वयंभू श्री महालक्ष्मी नाट्य नमन मंडळ कोतवडे यांनी पाप्त केला आहे. या अव्वल क्रमांक प्राप्त मंडळांना आकर्षक चषक, सन्मानपत्र व रोख पारितोषिक देउन गौरवण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री माघी गणेशोत्सव मंडळाचे अन्य पदाधिकारी, कोकण नमन कलामंच, रत्नागिरी यांनी मोलाची मेहनत घेतली.
स्पर्धेत लक्षवेधी ठरलेल्या भूमिका
‘राधा’ भूमिका सादरीकरण, स्वयंभू श्री महालक्ष्मी मंडळ कोतवडे, ‘त्रिपुरासुर’ भूमिका सादरीकरण- श्री विठ्ठल रखुमाई खापरे-धनावडे नमन मंडळ, ‘कृष्ण’ भूमिका सादरीकरण- श्री काशिविश्वेश्वर लिंगायत नमन मंडळ, सांबवाडी-केळये, ‘नारद’ भूमिका सादरीकरण- ओरी (बोरवाडी) नमन मंडळ यांना गौरवण्यात आले. लक्षवेधी चलचित्र देखावा-विश्वेश्वर नमन मंडळ, केळ्ये (ठिकवाडी), लक्षवेधी पार्श्वगायन (गौळण)- वीरवाडी कळझोंडी नमन मंडळ यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देउन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या स्पर्धेतील सादरीकरणात वैयक्तिक बक्षिसे पटकावलेले कलावंत-उत्कृष्ट खेळे सादरीकरण रानपाट नमन मंडळ ठरले. उत्कृष्ट कृष्ण- कु. नयन आंबेकर, जाकादेवी नमन मंडळ फणसवळे, कोंडवाडी, उत्कृष्ट गौळण- रवळनाथ रिमिक्स (लयभारी) मंडळाने सादरीकरण केले. उत्कृष्ट नारद- अमित डांगे, रवळनाथ रिमिक्स (लयभारी) मंडळ, उत्कृष्ट अभिनय- अनिल गोताड (भूमिका-दुरासद), स्वयंभू श्री महालक्ष्मी मंडळ कोतवडे, उत्कृष्ट पार्श्वगायन- श्रीकांत बोंबले, स्वयंभू श्री महालक्ष्मी मंडळ कोतवडे, उत्कृष्ट पार्श्वसंगित- शुभम बेंद्रे, भैरवनाथ नमन मंडळ-रानपाट, उत्कृष्ट पकाशयोजना- रवळनाथ रिमिक्स लयभारी मंडळ, उत्कृष्ट दिग्दर्शन- अमित डांगे, रवळनाथ रिमिक्स लयभारी मंडळ, उत्कृष्ट मृदूंग वादन- सुरेश गोणबरे, शंकर गोणबरे, भैरवनाथ नमन मंडळ-रानपाट यांना गौरवण्यात आले.