(अहमदाबाद)
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने गुजरातीमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडची अवस्था दयनीय केली. भारतीय वेगवान गोलंदाजांच्या वादळात सापडलेल्या किवींची फलंदाजी कुचकामी ठरली. भारताच्या २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांचा संपूर्ण संघ ६६ धावात तंबूत परतला. भारताने तिसरा टी २० सामना विक्रमी १६८ धावांनी खिशात घालत मालिका विजयाची घोडदौड कायम राखली.
भारताकडून फलंदाजीत शुभमन गिलने ६३ चेंडूत नाबाद १२६ धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत हार्दिक पांड्याने १६ धावा देत सर्वाधिक ४विकेट्स घेतल्या. भारताचे २३५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडसाठी पॉवर प्ले वाईट स्वप्नासारखा गेला. किवींना पहिल्या दोन षटकात दोन धक्के मिळाले. हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात फिन एलनला ३ तर दुस-या षटकात अर्शदीप सिंग डेवॉन कॉन्वेला अवघ्या १ धावेवर बाद केले. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीपने कॅम्पमनला शुन्यावर बाद करत किवींना तिसरा धक्का दिला. यानंतर हार्दिक पांड्याने ग्लेन फिलिप्सला 2 धावांवर बाद सूर्यकुमारने सामन्यातील दोन जबरदस्त कॅच घेत संघाचा विजय सुकर केला.
शुभमन गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत तो पाचवा भारतीय ठरला. शुभमन गिलच्या आधी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके ठोकली आहेत. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि न्यूझीलंडसमोर २३५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक नाबाद १२६ धावा केल्या. गिलने ५४ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात नाबाद १२६ धावा केल्या. त्याच्या ६३ चेंडूंच्या खेळीत त्याने १२ चौकार आणि ७ षटकार मारले. शुभमनने ५४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तर त्याआधी त्याने ३५ चेंडूत आुपले अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र, त्यानंतरच्या ५० धावा गिलने अवघ्या १९ चेंडूत ठोकल्या.
शुभमन तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा खेळाडू
या शतकानंतर शुभमन गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत तो पाचवा भारतीय ठरला. शुभमन गिलच्या आधी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके ठोकली आहेत.
इतकंच नाही तर शुभमन गिल टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. शुभमन गिलने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. विराट कोहलीने ८ सप्टेंबर २०२२ रोजी अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद १२२ धावांची खेळी खेळली होती.