(नवी दिल्ली)
प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्यावतीने यंदा सादर करण्यात आलेल्या ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ती’ चित्ररथाला दुसरा क्रमांक जाहीर झाला आहे. उत्तराखंडच्या चित्ररथाला प्रथम, तर उत्तर प्रदेशने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या वर्षी महाराष्ट्रासह 17 राज्यांची आणि विविध केंद्रीय मंत्रालयांची 10 अशी एकूण 27 चित्ररथे कर्तव्यपथावर झळकली होती.
महाराष्ट्र राज्याचे यापूर्वी 40 वेळा राजधानीत होणाऱ्या मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर केले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने राज्याच्यावतीने ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ती’ या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ यंदा सादर करण्यात आला होता. या माध्यमातून नारी शक्ती, राज्यातील मंदिर शैली आणि लोककलाचा अमूर्त वारसा प्रदर्शित करण्यात आला होता. राज्यात कोल्हापूरची अंबाबाई, करण्यात आली.
तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तिपीठे आहेत, तर, वणीची सप्तशृंगी हे अर्ध शक्तीपीठ आहे. या शक्तिपीठांना स्त्री शक्तीचे स्त्रोत मानले जाते. हे शक्तीपीठ यावर्षी चित्ररथाच्या माध्यमातून कर्तव्यपथावर दर्शविण्यात आले होते.