( क्रीडा )
भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज मुरली विजयने सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. त्याने स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. विजयने २०१८ मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. विजयला संघात स्थान मिळवण्यात सातत्याने अपयश येत होते आणि आता अशा परिस्थितीत त्याने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ३८ वर्षीय मुरली विजय भारताकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. २००८ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
मुरली विजयने टीम इंडियासाठी ६१ कसोटी सामन्यांच्या १०५ डावांमध्ये ३८.२८ च्या सरासरीने ३९८२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १२ शतके आणि १५ अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने १७ एकदिवसीय सामन्यांच्या १६ डावांमध्ये २१.१८ च्या सरासरीने ३३९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ९ अर्धशतक झळकावली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळताना त्याने १८.७७ च्या सरासरीने आणि १०९.७४ च्या स्ट्राइक रेटने एकूण १६९ धावा केल्या आहेत.