(मुंबई)
केवळ ऑनलाईन सुरू आहे किंवा यामध्ये परदेशी गुंतवणूक आहे म्हणून ऑनलाईन जुगार अधिकृत मानला जाऊ शकत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ऑनालाईन क्रिकेट व रम्मी खेळण्याचा पर्याय देणाऱ्या एका कंपनीने उच्च न्यायालयात याचिका केली होती. या कंपनीत ९६ टक्के परदेशी गुंतवणूक आहे, मात्र या गुंतवणुकीला करात सवलत आहे की नाही असा मुद्दा न्यायालयात उपस्थित झाला होता. ऑनलाईन खेळात जर पुरस्कार किंवा कसले आमिष दाखवले गेले तरच तो जुगार मानला जातो, पण जर दोन व्यक्ती तो खेळ खेळत असतील, तर ते जुगाराच्या व्याख्येत येत नाही. हा सर्व तपशील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सादर करण्यात आला. संबंधित यंत्रणेकडे याची माहिती देण्यात आली. त्यावर निर्णय न झाल्याने कंपनीने उच्च न्यायालयात याचिका केली.
कंपनी डायरेक्ट टॅक्सच्या माध्यमातून १२० कोटी भरते तर २६० कोटी इन डायरेक्ट टॅक्स भरते. कंपनीत ९६ टक्के परदेशी गुंतवणूक आहे. परदेशी गुंतवणूक असल्याने त्याचा तपशील संबंधित देण्यात आला. त्यावर निर्णय झालेला नाही. त्यावर निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.