(क्रीडा / प्रतिनिधी)
मुंबई मध्ये टाटा मुंबई मॅरथॉन शर्यत पार नुकतीच पार पडली. यामध्ये ५५ हजारांहून ड्रीम रन स्पर्धेत अधिक जण धावले. मुख्यमंत्री शिंदे यांनी झेंडा दाखवून ड्रीम रनला सुरूवात केली. तर त्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिनिअर सिटीझन गटाच्या मरेथॉनला झेंडा दाखवला. मॅरेथॉन स्पर्धेनिमित्ताने थंडी असताना तब्बल 55 हजार लोक या स्पर्धेत सहभागी होत धावले आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून टाटा मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली.
मुंबईकरांनी ‘हर दिल मुंबई’ चा नारा देत धावायला सुरुवात केली. मुंबई मॅरेथॉनचा ब्रॅन्डअॅम्बेसिडर अभिनेता टायगर जॅकी श्रॉफ उपस्थित होते. मुख्यतः सीएसटीपासून सुरू झालेली शर्यत वरळी सी लिंक वरून जात असताना सतेज कांदळगावकर याने ४२ किलो मीटर अंतरासाठी धावत अंतर पार केले.
सतेज कांदळगावकर हा २०१८ पासून अशा शर्यतीतून प्रयत्न करतोय. पत्रकार प्रमोद कांदळगावकर यांचा सतेज हा मुलगा होय. कोकणातून अनेकांनी फोन करून त्याचे अभिनंदन केले. सतेजचा ठाणे येथे ११ फेब्रुवारी २०२३ रोजी विवाह सोहळा संपन्न होत आहे.
मुंबईमध्ये टाटा मुंबई मॅरेथॉनच्यावतीने ‘ड्रीम रन’मध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू, व्यावसायिक खेळाडू आणि उत्साही नागरिकांव्यतिरिक्त, ग्रामीण महाराष्ट्रातील विविध भागांतील 20 महिला सरपंचांनी सहभाग घेतला होता. फुल मॅरेथॉनचा मार्ग सीएसएमटीपासून सुरू होऊन शहराच्या मध्यभागातून आयोजित करण्यात आला होता. तर हाफ मॅरेथॉन माहीम दर्ग्यापासून वांद्रे-वरळी सीलिंक, महालक्ष्मी रेसकोर्स, हाजी अली, पेडर रोड, बाबुलनाथ मंदिर आणि चौपाटी ओलांडून आझाद मैदानावर समाप्ती करण्यात आली.
खासदार संजय राऊत, खासदार मनोज कोटक व आमदार सुनील राऊत यांनी सतेज कांदळगावकर यांचे कौतुक करुन. अभिनंदन देखील केले. सतेजच्या यशस्वी कामगिरी बद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.