( प्रतिनिधी / लांजा )
रत्नागिरी जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात लांजा तालुक्याचे नावलौकिक असुन तालुक्याने आपला सांस्कृतिक ठसा उमटवत आला आहे. येथील ग्रामीण भागातील युवा कलाकारांनी एकत्र येऊन सद्या एका नव्या मराठी गाण्याची निर्मीती केली आह. हे गाणे रसिकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. लांजा तालुक्यासारख्या ग्रामीण भागात चित्रीकरणासाठी तंत्रशुध्द सुविधा नसतानाही येथील युवा ध्येयवेड्या कलाकारांनी तयार केलेल्या गाण्याचे व कलाकारांचे कौतुक केले जात आहे.
लांजा तालुक्याची सांस्कृतिक क्षेत्रात आपली घोडदौड सुरू असून येथे नाटक, एकांकीका, पथनाट्ये, भजन, नमन, भारुड, जाखडीनृत्य अशा विविध लोककला लांजा तालुका जपत आला आहे. कलावंताबरोबच येथील नैसर्गिक सौंदर्य सध्या चित्रपट सृष्टीलाही लांजा तालुका खुणाऊ लागला आहे. तालुक्यात मराठी चित्रपटांचेही चित्रीकरण होऊ लागले आहे. ग्रामीण भाग असल्याने व चित्रीकरण करण्याची मोठी इच्छा असुनही याठिकाणी चित्रिकरणासाठी पुरेशा तंत्रशुध्द सुविधा नसल्याने येथील कलाकारांचा हीरमोड होत आहे. मात्र सुविधांची वानवा असूनही ग्रामीण भागात राहून आपण दर्जेदार चित्रीकरण करु शकतो हा नवा पायंडा तालुक्यातील एका तरुणाने घातला आहे. धेय्यवेड्या युवा कलाकारांनी एकत्र येऊन स्वतःची निर्मीती आणि चित्रीकरणाचे स्वप्न पुर्णत्वाला नेण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या धेय्यपुर्ती कलाकारांचे लांजा तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.
लांजा तालुक्यातील बेनीखुर्द तेथील अनिकेत अनंत जाधव (अॅनिमेता जे क्रिएशन व टीम) या युवा तरुण कलाकाराने स्वतःचे अभिनय क्षेत्र जपताना तालुक्यातील इतर सहकारी कलाकारांना व मित्रांना सोबत घेऊन स्वतःहुन एका गाण्याची निर्मीती केली आहे. महाविद्यालयीन जीवनात असताना स्वप्न उराशी बाळगून स्वतः सह आपल्या मित्रांना सोबत घेऊन ग्रामीण भागातच चित्रीकरण करेन असा अट्टाहास अनिकेत यांने मनाशी पक्का केला होता आणि तो सत्यात उतरवला आहे. ग्रामीण भागातील गीतकाराने लिहीलेल्या गाणे घेऊन त्यावर डान्सच्या माध्यमातून चित्रीकरण पुर्ण केले आहे. विशेष म्हणजे या मराठी गीतामध्ये लांजा तालुक्याच्या ग्रामीण भागातील तरुण-तरुणी कलाकारांचा नृत्य अविष्कार पहायला मिळणार आहे. यासह गिताचे संपुर्ण चित्रीकरण लांजा तालुक्यातील ग्रामीण भागासह रत्नागिरी येथे झाले आहे. बेनीखुर्द, खेरवसे, लांजा यासह रत्नागिरी येथील समुद्र किनारा व परिसराचे नैसर्गिक सौंदर्य पहायला मिळणार आहे. “” पोरीचं रुप”” हे असे गाण्याचे बोल असून सुमधूर संगीतबद्ध गाणे रसिकांना ऐकायला व बहारदार डान्स पहायला मिळणार आहे.
गाण्याचे दिग्दर्शन, निर्माता अनिकेत जाधव यांचे असून सह दिग्दर्शकन आर्यन कासारे, हृषिकेश धनावडे यांचे आहे. गाणे शरद जाधव यांनी गायले असून अनिकेत जाधव, ऐश्वर्या मयेकर , विशाल जाधव, सुरज जाधव, विशाल जाधव हे कलाकार असून सुशीलकुमार बंडबे, प्रविण कांबळे (गवाणकर), रोशन, शौनक यासह अॅनिमेता जे क्रिएशन टीम यांचे व्यवस्थापन आहे.