(नवी दिल्ली)
जगभरात अँड्रॉइड आणि अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टिमचा दबदबा असला तरी याला आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भारतातील आयआयटी मद्रासच्या फर्मने एक स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम बनवली (ओएस) आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतीच या स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग “भारओएस”ची यशस्वी चाचणी केली. हे सॉफ्टवेअर कमर्शिअल ऑफ-द-शेल्फ हँडसेटवर इनस्टॉल केले जाऊ शकते.
केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम भारओएसबद्दल सांगितले की, जगभरात असे बरेच लोक आहेत जे अडचणी आणतील आणि अशी सिस्टम यशस्वी होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. अत्यंत काळजीपूर्वक आणि चिकाटीने प्रयत्न करून ते यशस्वी करण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल.
भारओएस ज्याला भारोस देखील म्हटले जाते. ही एक स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम आहे. ही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या इनक्यूबेटेड फर्मने विकसित केली आहे. भारतातील १०० कोटी मोबाईल फोन युजर्सला या ओएसचा फायदा होईल, असा दावा केला जात आहे. या ओएसची खास गोष्ट म्हणजे यात हाय-टेक सेफ्टी आणि प्रायव्हसी फीचर्स आहेत. म्हणजेच या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममध्ये युजर्सला त्यांच्या गरजेनुसार अॅप्स निवडण्यासाठी आणि वापरण्यासाठी अधिक स्वातंत्र्य, नियंत्रण आणि लवचिकता मिळते.
भारओएसची कमर्शिअल ऑफ-द-शेल्फ हँडसेटवर इनस्टॉल केले जाऊ शकते. तसेच भारओएसची कोणत्याही डीफॉल्ट अॅप्ससह येतो. याचा अर्थ असा की, युजर्सला माहित नसलेला किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने सेफ नसलेले अॅप वापरण्याची सक्ती केली जात नाही. हे मूळ ओएस युजर्सला त्यांच्या डिव्हाइसवर असलेल्या अॅप्सवर अधिक नियंत्रण देते.