भारताचे दिग्गज, विख्यात वास्तुविशारद डॉ. बालकृष्ण विठ्ठलदास दोशी यांचे अहमदाबाद येथील राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. डॉ. बी. व्ही. दोशी हे विख्यात वास्तुविशारद आणि शहर नियोजनकार होते. त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
दोशी यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे वास्तुविशारद क्षेत्रातील नोबेल समजल्या जाणा-या प्रित्झकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने सन्मानित होणारे डॉ. दोशी पहिले भारतीय होते. वास्तुविशारद डॉ. बालकृष्ण दोशी यांचा जन्म १९२७ मध्ये पुण्यात झाला.
डॉ. बालकृष्ण दोशी यांनी ली कार्बुजिअर आणि लुई कान यांसारख्या दिग्गज वास्तुविशारदासह काम केले होते. इंडोलॉजी संस्थान, सीईपीटी विद्यापीठ, अहमदाबादमधील कनोरिया कला केंद्र, आयआयएम बंगळुरू, इंदूरमधील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठीच्या अरन्या लो कॉस्ट हाऊसिंग आदी प्रकल्पांची वास्तुरचना त्यांनी केली.