गेले वर्षभर व्यापारी छोटे व्यावसायिक आर्थिक संकटात पिचले आहेत. नोकरदार वर्गाचे हालहाल झाले आहेत.कुटुंबचा उदरनिर्वाह चालवणे कठीण बनले असताना आता पुन्हा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन का ? असा थेट प्रश्न उपस्थित करत चिपळूण शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शहा यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला कडाडून विरोध केला आहे. ज्या भागात कोरोना रुग्ण जास्त आहेत त्याच ठिकाणी कडक लॉकडाऊन करा. संपूर्ण जिल्ह्याला वेठीस धरू नये असेही त्यांनी ठणकावले आहे.
शासनाचे लॉकडाऊन सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाने आणखी कडक लॉकडाऊन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या बाबत लियाकत शहा म्हणाले; संपूर्ण देशात जसे लाँकडाऊन केले नाही तसेच संपूर्ण जिल्हा लाँकडाऊन करु नये ज्या तालुक्यात करोना रुग्णाची संख्या जास्त आहे त्यामध्ये शहर व ग्रामीण संख्या पाहून त्या ठिकाणी कडक लाँकडाऊन करून काटेकोर पालन करावे, ग्रामीण भागात गाव प्रमाणे कंटेंटमेंट झोन करावे. रत्नागिरी जिल्हा राजापूर पासून मंडणगड महाडच्या टोका पंर्यत आहे. जर करोना रुग्णांची संख्या रत्नागिरी जास्त असेल तर मंडणगड तालुका लाँकडाऊन करून फार मोठा फायदा होणार नाही. व्यापारी गेले वर्षभर लाँकडाऊन चा मार सोसून मेठाकुठीस आला आहे किरकोळ व्यापारी भाडे, लाईटबिल, कामगार पगार ,बँकेचे हफ्ते, घरखर्च, कसा चालवणार या गोष्टी प्रशासनाने विचार करावा.
याबाबतीत पालकमंत्री, मंत्री महोदय, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार याचाशी चर्चा करून संपूर्ण जिल्हा लाँकडाऊन नकरता ज्या शहरात रूग्णाची संख्या कमी आहे तेथे 10 ते 5 वाजेपर्यंत व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी. भविष्यात काही व्यापारी कर्ज बाजारी होऊन आत्महत्या करतील अशी परिस्थिती उद्भभवु शकते. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन हा विचार करू नये. अन्यथा चिपळूण शहर काँग्रेस तीव्र विरोध करेल असा इशारा देखील दिला आहे.