(रत्नागिरी)
संगमेश्वर तालुक्यातील फूणगूस कडेवठार येथील सिद्धीविनायक मंदिरात आज २४ जानेवारी ते २६ जानेवारी २०२३ या तीन दिवसाच्या कालावधीत माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० ते ८.०० ह.भ.प. भालचंद्र हळबे रत्नागिरी यांचे कीर्तन, आरती, भोवत्या, बुधवारी २५ जानेवारीला सायंकाळी ५.३० ते ८.०० ह.भ.प. भालचंद्र हळबे रत्नागिरी यांचे गणेश जन्माचे किर्तन, आरती, भोवत्या गुरुवारी २६ जानेवारीला दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५.३० ते ८.०० ह.भ.प भालचंद्र हळबे रत्नागिरी यांचे लळीताचे कीर्तन, आरती, भोवत्या, शुक्रवारी २७ जानेवारी रोजी रात्री संगीत नाटक- संगीत सुवर्ण तुला असे कार्यक्रम होणार आहेत.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन फुणगूस कडेवठार ग्रामस्थांनी केले आहे.