(रत्नागिरी)
जि.प.माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्यावतीने आयोजित विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ माध्यमिक शाळा सेवक पतपेढी येथे नुकताच घेण्यात आला.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ.सुवर्णा सावंत चालती-फिरती प्रयोगशाळा संयोजक बाळकृष्ण चव्हाण, रत्नागिरी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शैल्य पुजारी, शृंगारतळी उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शगुफ्ता सौराज, जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार, कोषाध्यक्ष मोहन पाटील, सदस्य राजेंद्र कुंभार, सुदेश कदम, रत्नागिरी तालुका विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र रहाटे, तालुका सचिव इम्तियाज सिद्धिकी आदी मान्यवर उपस्थित होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यात आणि तालुक्यात यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले
पारितोषिक वितरणप्रसंगी सौ. सुवर्णा सावंत म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या प्रयत्नातून मिळणाऱ्या गोष्टींचा उपयोग चांगल्या प्रकारे करुन घ्या असे आवाहन केले. विजेच्या दिव्याचा शोध लावणाऱ्या थाॅमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञाचे उदाहरण देखिल त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. तसेच विज्ञान मंडळाच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा देत विज्ञान मंडळाचे विशेष कौतुक केले. विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी विद्यार्थ्यांनी संशोधनवृत्ती अंगी बाणवून विविध विषयात संशोधन करुन जिल्ह्याचे नाव मोठे करावे असे सांगितले. भविष्यात विज्ञान मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनामध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले आहे त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शैल्य पुजारी,शृंगारतळी उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शगुफ्ता सौराज, जिल्हा विज्ञान मंडळ सदस्य सुदेश कदम, तौसीफ अन्सारी, विद्यार्थी प्रतिनिधी अदिती जाधव, पायल वनगुले, पालक प्रतिनिधी सौ. सृष्टी सरफरे यांनी मनोगते व्यक्त केली. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन इम्तियाज सिद्धिकी यांनी केले तर राजेंद्र कुंभार यांनी आभार मानले. विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेच्या आयोजनासाठी उपाध्यक्ष आर.व्ही.जानकर, कार्यवाह प्रभाकर सनगरे, सर्व पदाधिकारी, राखी केळकर यांनी मेहनत घेतली.
(छायाचित्र– प्रसाद फोटो व्हिजन, रत्नागिरी)