(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील करबुडे येथील तरुणीने अज्ञात कारणातून कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले आहे. ही घटना रविवार 22 जानेवारी रोजी घडली आहे.
समिक्षा संतोष खापरे ( १९, रा. खापरेवाडी-करबुडे) असे विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणीचे नाव आहे. विषारी औषध प्राशन केल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रविवारी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तिची तब्येत खालावल्याने तिला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.