( दापोली/ प्रतिनिधी )
तालुक्यातील जोगळी नागरबुडी येथे घर फोडून 2 लाख 29 हजार 100 रुपयांचे दागिने चोरीस गेल्याची घटना 20 जानेवारी सकाळी 11.30 ते 11 जानेवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद संजय विठोबा पारदुले (51, जोगळी, नागरबुडी, दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय पारदुले यांचे कुटुंब घरी नसताना अज्ञाताने घरातील किचन रुममधील लोखंडी कपाटाचे लॉक चावीने उघडून पर्समधील दागिने लांबवले. रोख रक्कम व दागिने असा एकूण 2 लाख 29 हजार 100 रुपयांचा ऐवज अज्ञाताने चोरुन नेला. याप्रकरणी संजय पारदुले यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर भादविकलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.