( संगमेश्वर / प्रतिनिधी )
एलपीजी गॅस टँकरची चोरी करणार्या टँकर चालकाविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शमशाद निसार खान (उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया कंपनीचे डेप्युटी मॅनेजर शुभांक सिंग (नागपूर, सध्या रत्नागिरी) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. ही घटना 19 जानेवारी रोजी सकाळी 10 ते रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर चालक शमशाद खान हा आपल्या ताब्यातील गॅस टँकर जयगड ते खोपोली असा घेवून जात होता. यावेळी गॅस टँकर कॉन्फिडन्स पेेट्रोलियम इंडिया या कंपनीकडे अथवा मॅनेजरकडे संमती घेणे आवश्यक होते मात्र तसे न करता शमशाद याने परस्पर लंपास केला. याप्रकरणी कंपनीचे डेप्युटी मॅनेजर शुभांक सिंग यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात 6 लाख 61 हजार 710 रुपये किंमतीचा टँकर चोरीस गेल्याची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शमशाद निसाद खान याच्यावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.