(रत्नागिरी)
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी २७ जानेवारी,२०१९ प्रधान कार्यालयाच्या रूपाने रत्नागिरी येथे प्रत्यक्ष व्यवसायाला प्रारंभ केला. संस्थेची डिसेंबर २२ अखेर ४१८० सभासद संख्या तर ०७ कोटी ७१ लाखाच्या ठेवी, ०६ कोटी २२ लाखांची कर्जे, ०२ कोटी ७७ लाखाची गुंतवणूक, ०९ कोटी ४६ लाखांचे खेळते भांडवल, ०१ कोटी ३२ लाख स्वनिधी, ६६.२३ % सी. डी.रेशो, ९५.०६% वसुली, १००% सोनेतारण कर्ज वसुली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. चा राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार २०२२ कोकण विभागातून गट क्र १ मध्ये १ ते १० कोटी ठेवी असणा-या गटांमध्ये प्रथम क्रमांकाचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील अल्पावधीतच दिपस्तंभ पुरस्कार पतसंस्थेला प्राप्त झाला आहे.
अल्पावधीतच शृंगारतळी, दाभोळ, खंडाळा, पालशेत, पूर्णगड या पतसंस्थेच्या नवीन पाच शाखांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११.३० वा.दाभोळ शाखेचे उद्घाटन काकासाहेब कोयटे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व कार्याध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संगीता दाभोळकर, सरपंच ग्रामपंचायत, दाभोळ, तृप्ती उपाध्ये सहाय्यक निबंध, दापोली तालुका, राजनभाई दळी, उद्योजक कृपा औषधालय धोपावे, स्मिता जावकर माजी सभापती पंचायत समिती, रवींद्र नाटेकर, अध्यक्ष दर्यावर्दी मश्चिमार संस्था यांची उपस्थिती लाभणार आहे. सर्वांनी या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी केले आहे.