( रत्नागिरी )
जिल्ह्यात मतदार यादीत दोन ठिकाणी नावे असलेल्या मतदारांना आता चाप बसणार आहे. एकच मतदार दोन ठिकाणी मतदान करण्याचा प्रकार आता थांबणार आहे.
५ जानेवारी २०२३ रोजी मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली गेली आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदार यादीत दुबार आलेली नावे आणि दुबार फोटो असलेल्या मतदारांची नावे शोधण्यात आली. त्यानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात असे ७१ दुबार मतदार आढळले आहेत. बीएलओंच्या माध्यमातून ही नावे कमी करण्यात येणार आहेत.