(मुंबई)
अभिनेत्री राखी सावंतला गुरुवारी आंबोली पोलिसांनी ताब्यात घेऊन ६ तासांच्या चौकशी केल्यानंतर सोडून दिले आहे. एका अभिनेत्रीने राखी सावंत विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर राखीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ६ तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी राखीला सोडून दिले आहे.
राखी सावंत यांनी या पोलिसांच्या चौकशीत सहकार्य केले असल्याचे सांगण्यात आले. शिवाय राखी सावंतने चौकशीसाठी तिचा मोबाईलसुद्धा पोलिसांना दिला. राखी सावंत आंबोली पोलिस स्टेशनमधून हात जोडून बाहेर निघाली. राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप होता. एका मॉडेलचा हा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखीला अटक झाली आहे. अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने ट्विट करत याविषयीची माहिती दिली. या ट्विटमध्ये शर्लिनने एफआयआरविषयीही माहिती दिली आहे. शर्लिनच्या तक्रारीनंतरच अंबोली पोलिसांनी राखीला अटक केल्याची माहिती मिळत आहे.
शर्लिन चोप्रा ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 2012 मध्ये तिने ‘प्लेबॉय’ मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याच्या दोन वर्षांनंतर तिचे फोटो समोर आले होते. एमटीव्ही स्पिल्ट्सविलाच्या सहाव्या सिझनचं तिने सूत्रसंचालन केलं. तिने बिग बॉसमध्येही भाग घेतला होता.
BREAKING NEWS!!!
AMBOLI POLICE HAS ARRESTED RAKHI SAWANT IN RESPECT WITH FIR 883/2022
YESTERDAY, RAKHI SAWANT’S ABA 1870/2022 WAS REJECTED BY MUMBAI SESSIONS COURT
— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)🇮🇳 (@SherlynChopra) January 19, 2023
या मॉडेलच्या तक्रारीवरून राखीवर आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तिच्या तक्रारीवरुन नोव्हेंबर २०२२ मध्ये माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत राखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करूनही ती हजर राहात नव्हती. त्यामुळे गुरुवारी पोलिस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले होते. मुंबईच्या सत्र न्यायालयाने राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.