(दापोली)
आर.व्ही.बेलोसे एज्युकेशन फौडेशन दापोली संचलित न.का.वराडकर कला, रा.वि. बेलोसे वाणिज्य महाविदयालय दापोली मराठी विभाग आयोजित शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे दि. १० जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे’ आयोजन करण्यात आहे. या पंधरवडयामध्ये महाविदयालयामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, व्याख्याने, घोषवाक्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा इत्यादीचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते ११:०० या वेळेत दापोली तालुक्यातील सुप्रसिद्ध शेतकरी, व्यावसायिक, किर्तनकार श्री तेजस जोशी, गाव आंजर्ले, मुर्डी गाव यांचे व्याखान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानासाठी संत साहित्य, किर्तन परंपरा, त्याचे महत्त्व व गरज हा विषय होता. या व्याख्यानातून त्यांनी संतांचे योगदानाचे महत्त्व विषद केले. संत तुकाराम, संत एकनाथ, संत रामदास यांच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्याचा आढावा घेतला. याचबरोबर त्यांनी छत्रपती शिवरायांचे महत्त्व अधोरेखित केले. ओवी, अभंग, आर्या व ग्रंथ यांचे वाचन कसे करावे, अभ्यास कसा करावा. समाजप्रबोधनासाठी किर्तन प्रवचनाची आवश्यकता सांगितली. समाजातील अनिष्ट, रूढी, परंपरा घालवून मोबाईलचा वापर आवश्यक तेवढाच करावा. फेसबुक, व्हॉट्सअपवरच्या प्रतिक्रिया अभ्यासाशिवाय देवू नयेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.भारत क-हाड यांनी समारोप करताना आजच्या तरुणांनी मराठी भाषेचा अभ्यास करायला हवा, भाषेचं संवर्धन करायला हवे. किर्तन-प्रवचनातून समाज घडविण्यासाठी उर्जा मिळते असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा.उत्तम पाटील यांनी केले. शेवटी कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व विद्यार्थी यांचे प्रा.दिपक गडकर यांनी आभार मानले. साहित्याविषयी आवड असणारे विद्यार्थी व मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांनी याचा आस्वाद घेतला.