(रत्नागिरी)
पुणे येथे नुकतीच 33 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील, महिला पोलीसानी वैयक्तिक कामगिरी करत 7 सुवर्ण व 3 कांस्य पदके प्राप्त केली. तसेच सांघिक स्पर्धेमध्ये कोकण परिक्षेत्रामधून 1 सुवर्ण व 1 कांस्य पदक प्राप्त केले.
या स्पर्धेमध्ये, रत्नागिरी पोलीस दलातील मंजिरी सुरेश रेवाळे, (पोलीस मुख्यालय) यांनी 3 सुवर्ण पदके प्राप्त केली. त्यांनी सर्व स्पर्धकांमध्ये सरस कामगिरी करत “बेस्ट ऍथलेटिक्स प्लेअर अवॉर्ड 2023 प्राप्त करून रत्नागिरी पोलीस दलाच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला आहे.
या स्पर्धेमधील ठळक वैशिष्टे
1) ऍथलेटिक्स, धावणे, 100 मीटर महिला – प्रथम क्रमांक, मंजिरी सुरेश रेवाळे (पोलीस मुख्यालय)
2) लांब उडी, महिला प्रथम क्रमांक – मंजिरी सुरेश रेवाळे, 5.37 मी लांबीची उडी मारून नवीन स्पर्धा विक्रम नोंदविला.
3) धावणे, 4+100 मीटर टीले, महिला – प्रथम क्रमांक, मंजिरी सुरेश रेवाळे (पोलीस मुख्यालय)
4) धावणे, 200 मीटर, महिला प्रथम क्रमांक, अमृता वडाम (पोलीस मुख्यालय)
5) धावणे, 400 मीटर हर्डल्स, महिला प्रथम क्रमांक, अमृता वडाम ( पोलीस मुख्यालय)
6) धावणे, 100 मीटर हर्डल्स, महिला प्रथम क्रमांक – शीतल संभाजी पिंजरे ( पोलीस मुख्यालय)
7) उंच उडी, महिला प्रथम क्रमांक – शीतल संभाजी पिंजरे, पोलीस मुख्यालय यांनी 1.65 मीटर
8) कुस्ती, 57 कि. वजनी गट, महिला तृतीय क्रमांक, तेजस्विनी जाधव, खेड, पोलीस ठाणे रत्नागिरी
9) वेट लिफ्टिंग, 55 कि. वजनी गट, महिला -तृतीय क्रमांक, म.पो.कॉ / पूजा गायकवाड (पोलीस मुख्यालय)
10) बॉक्सिंग, 75 कि. वजनी गट, पुरुष तृतीय क्रमांक, बालाजी धेम्बरे (पोलीस मुख्यालय रत्नागिरी)
11) धावणे, 110 मिटर हर्डल्स, पुरुष – तृतीय क्रमांक, – रोहित मांगले ( पोलीस मुख्यालय रत्नागिरी )
तसेच सांघिक कामगिरीमध्ये कोंकण परीक्षेत्रातर्फे खेळताना
1) कबड्डी पुरुष संघाकरिता 1 सुवर्ण पदक
2) खो-खो, महिला संघाकरिता 1 कांस्य पदक प्राप्त केले आहे.