(देवरूख /सुरेश सप्रे)
महाराष्ट्र राज्याने धम्मसंहिता बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा अमलात आणावा म्हणून दि धम्मसंहिता अँक्शन कमिटी आँफ इंडीया यांचेवतीने राष्टीय मुख्य समन्वयक अँड. दिलिप काकडे व समन्वयक दादा मर्चंडे यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात जनसमर्थन अभियान राबविण्यात येत आहे.
या जनसमर्थन अभियानाचा भाग म्हणून डाँ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह देवरूख येथे संगमेश्वर तालुक्यातील धार्मिक, सामाजिक, रायकीय संस्था व संघटना यांच्या सहभागाने अभियान राबविले जात आहे. तालुक्यातून जनसमर्थन मिळावे म्हणून सर्व बुद्ध विहारात हे अभियान राबविले जाणार आहे..
बाकी धर्माप्रमाणे बौद्ध धर्मासाठी धम्मसंहिता असावी, यासाठी राज्य सरकारशी पाठपुरावा केला असता सदरची मागणी मान्य केली असली तरी अल्पसंख्याक विभागाकडून पुढील पुर्तता केली जात नसल्याने मसुदा समिती स्थापन करण्यात उशीर होत आहे. यासाठी धम्मसंहिता अँक्शन कमिटी तर्फे नुकतीच मुख्यमंत्री यांना निवेदन देवून वस्तूस्थिती लक्षात आणून दिली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीविषय समजून घेवून लवकरच सर्वसमावेशक मसुदा समितीची स्थापना केली जाईल व लवकरच बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा आणला जाईल असे आश्वासन दिले आहे.
प्रत्येक धर्माला व्यवस्थापन कायदा आहे. परंतु देशात बौद्ध धर्माला मात्र हा कायदा नसल्याने फार मोठी धार्मिक अडचण होत आहे. यासाठीच बौद्ध धर्माला आचारसंहिता व्यवस्थापन कायदा व्हावा याकरिता प्रयत्न केले जात आहेत. बौद्ध धर्माला बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा लागू झाल्यास धर्माच्या नावाखाली तंटे अनेक विवाद संपुष्टात येवून
सर्व धर्माप्रमाणे बौद्ध धर्माचा प्रसार केला जाईल, असा विश्वास अँड. दिलिप काकडे यांनी व्यक्त केला