(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुका कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष विलास महादेव पवार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी अल्पशा आजाराने 12 जानेवारी रोजी आकस्मिक निधन झाले. विलास पवार यांनी एम ए बी एड पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते पदवीधर शिक्षक म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत होते. आपली शिक्षकी पेशातील तीस वर्षांची सेवा ते बजावत असताना त्यांना गेल्या दोन महिन्यांपूर्वी एका अल्पशा आजाराने ग्रासले होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावली होती अशातच उपच्यारादरम्यान कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
विलास पवार हे रत्नागिरी तालुका कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष म्हणून कार्यरत असतानाच बौद्धजन पंचायत समिती गाव शाखा मालगुंड येथे सभासद म्हणून कार्यरत होते. या संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आणि संघटनेमध्ये एक योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा विशेष परिचय होता . त्यांनी मालगुंड गाव शाखेमध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून येथील प्रत्येक धार्मिक व सामाजिक कामकाजात आपले मोठे योगदान दिले होते. अतिशय शांत, प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे म्हणून ते ओळखले जात होते. तसेच विविध क्षेत्राची त्यांना चांगली माहिती होती. असे हे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व अचानक काळाच्या पडद्याआड निघून गेल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ञ मंडळी, त्यांचा सर्व शिक्षक मित्रपरिवार, त्यांचे सर्व नातेाइक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .
त्यांच्या आकस्मिक मृत्यूचे वृत्त समजताच बौद्धजन शाखा क्रमांक 17 तथा बौद्ध ग्रामस्थ मंडळ स्थानिक व मुंबई आम्रपाली महिला मंडळ स्थानिक व मुंबई आणि विविध संस्था संघटनाच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. त्यांचा जलदान विधी कार्यक्रम 22 जानेवारी 2023 रोजी रत्नागिरी करवांचीवाडी येथील त्यांच्या शांतीदूत या निवासस्थानी सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विविध स्तरातील बंधुभगिनीनी उपस्थित राहावे, असे आव्हान बौद्धजन पंचायत समिती मालगुंड गाव शाखेच्याच्या वतीने करण्यात आले आहे. विलास पवार यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुलगे , भावजय, बहिण, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे.