(मुंबई)
सरकारी बँक आयडीबीआयने आपल्या निधीवर आधारित कर्ज व्याजदरात वाढ करून त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने सर्व कालावधीसाठी एमसीएलआर 0.20 टक्क्यांनी वाढवला आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार एमसीएलआर 12 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. एमसीएलआरमधील वाढ थेट आपल्या कर्जावर परिणाम करेल. ज्यामुळे तुमच्या कर्जाचे हप्ते वाढू शकतात.
आयडीबीआय बँकेच्या अधिकृत संकेतस्थाळानुसार बँकेने एमसीएलआर दर 7.65 टक्के केला आहे. एका महिन्याच्या एमसीएलआरसाठी 7.80 टक्के, तीन महिन्यांसाठी 8.10 टक्के आणि 6 महिन्यांच्या एमसीएलआरसाठी 8.30 टक्के दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच आयडीबीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी 1-वर्षाच्या एमसीएलआरसाठी वर 8.40 टक्के, 2-वर्षाच्या एमसीएलआरसाठी 9 टक्के आणि तीन वर्षांच्या एमसीएलआरसाठी 9.40 टक्के निश्चित केले आहे.
https://twitter.com/themaktab/status/1613496773435088897?t=2e2RjgM0IqVfTKwAJQ7hwQ&s=19
बँकेने मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये २० बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. MCLR वाढल्याने गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज महाग होणार आहे.