( चिपळूण / प्रतिनिधी )
शहरातील प्रथमेश अपार्टमेंट, शिवाजीनगर चिपळूण येथे 28 वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मयुर युवराज गमरे (28, रा. प्रथमेश अपार्टमेंट, शिवाजीनगर, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 12 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर गमरे हा 12 जानेवारी रोजी सकाळी बेडवर असतानाच त्याला अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्याला नीट श्वास घेता येत नव्हता. त्यामुळे तो जोरजोरात धापा टाकत होता. अचानक श्वास घेणे बंद झाल्याने तो बेडवर निपचीत पडला. मयुर याला सकाळी उठवण्यासाठी त्याचा भाउ गेला असता त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. भावाने लगेचच मामाला बोलावून घेतले. तात्काळ चिपळूणातील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मयुर याला मयत घोषित केेले आहे.