( संगलट – खेड / इक्बाल जमादार )
खेड तालुक्यातील खारीपट्टा विभागामधील प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव येथे स्वच्छता भारत अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी अक्षय पवार, डॉक्टर नितीन मोरे, आरोग्य सहाय्यक श्री प्रवीण बेलोसे, आरोग्य कर्मचारी जाधव, श्रीमती शिरगावकर चव्हाण सिस्टर तसेच आशा मदतनीस व इतर कर्मचाऱ्यांनी सकाळपासून मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवले. संपूर्ण आरोग्य परिसरात सुमारे एक किलोमीटर पर्यंत स्वच्छता करून वैद्यकीय अधिकारी पवार तसेच नितीन मोरे व कर्मचाऱ्यांनी एक आदर्श निर्माण केला.
फोटो : भारत स्वच्छता अभियान राबवताना आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री पवार, श्री नितीन मोरे,आरोग्य सहाय्यक श्री बेलोसे, आरोग्य सहाय्यक सानिका देवलेकर (चव्हाण) तसेच कर्मचारी वर्ग व टीम दिसत आहे (छाया – इक्बाल जमादार, संगलट खेड )