(देवरूख /सुरेश सप्रे)
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने व रत्नागिरी तयकवाँदो स्पोर्ट्स असोसिएशन व शाहणुर चिपळूण तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धा 14/17/19 वयोगटामध्ये क्रीडा संकुल डेरवण सावर्डा या ठिकाणी संपंन झाल्या होत्या. या स्पर्धमध्ये सुवर्ण पदक पटकाविलेल्या खेळाडूंची निवड कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली होती.
कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धा दिनांक 16 ते 18 जानेवारी दरम्यान श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा या ठिकाणी संपन होणार असून या स्पर्धेसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या 5 जिल्ह्यातील सुवर्ण पदक पटकावलेले सुमारे 400 खेळाडू सहभागी होणार आहेत.
सदर कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुक्यामधून 11 खेळाडू जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार असून या खेळाडूंना शुभेच्छा कार्यक्रम पी. एस.बने इंटरनॅशनल स्कूल साडवली येथे संपन्न झाला. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष व तायक्वांदो क्लब अध्यक्ष रोहन बने, क्लब अध्यक्षा सौ स्मिता लाड, तालुका समन्वयक अभिजित कदम, सौ समीक्षा बने क्लब सदस्या सौ पुनम चव्हाण, तालुका प्रमुख प्रशिक्षक जिल्हा खजिनदार शशांक घडशी, क्लब प्रशिक्षक स्वप्नील दांडेकर, अविनाश जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे स्वराली विशाल शिंदे, तनुश्री गणेश नारकर, आयुष संतोष वाजे, तनिष्क विनायक खांबे, यश कृष्णा, राज रोशन रसाळ, ओम योगेश घाग, गंधर्व सुजित शेट्ये, भूमिका महेंद्र शिंदे, साहिल शशांक घडशी, श्रावणी सचिन इप्ते या यशस्वी तायक्वांडो पटूना तालुक्याचे आम. शेखर निकम, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आम. सुभाष बने, नगराध्यक्षा सौ मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव कदम, अभिजित शेट्ये, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, चिन्मय साने, आदिनी शुभेच्छा दिल्या