(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील अलोरे चेंबरी येथे धक्कादायक घटना घडली आहे. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरीशी प्रेमविवाह केल्यानंतरही पती-पत्नीने राहत्या घरी जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. असा कोणता प्रसंग त्यांच्यावर आला, ज्यामुळे त्यांना जीवन संपवाव लागलं. संजय सदा निकम (33 वर्षे), व सोनाली संजय निकम ( 25 वर्षे ) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय निकम याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने सोनाली हिच्याशी प्रेमविवाह केला होता. सोमवार 9 जानेवारी रोजी दुपारी दोघेही मजुरीचे काम करून सायंकाळी घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी रोजच्या प्रमाणे जेवण करण्यास घेतले. मात्र, यावेळी त्यांनी जेवणात विष टाकले. या दोघांनी जेवणासहित विष घेऊन झोपी गेले. मात्र रात्री आजी घरी परतली. तेव्हा तिने दोघाना झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कोणताच प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावले. त्यानंतर या दोघांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
या संपूर्ण घटनेबाबत मृत पती-पत्नीच्या आजी यांनी रात्री उशिरा शिरगाव पोलीस स्थानकामध्ये तक्रार देण्यासाठी धाव घेतली. जोडप्याच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, संजय निकम व सोनाली निकम या जोडप्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. आर्थिक संकटाला कंटाळून जोडप्याने पाऊल उचललं का, की काही इतर काही कारण आहे, हे समोर आलं नाही. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.