महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने वेळोवेळी अनेक आदेश निर्गमीत केलेले आहेत, त्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हा प्रशासनाने सुध्दा कोरोना प्रतिबंधक आदेश जारी केलेले आहे. या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व हॉटेल व रेस्टांरंट यांना सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या कालावधीत कोरोना नियमावलींचे पालन करुन फक्त घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. या नियमावलीनुसार हॉटेलमध्ये बसुन जेवण्यास मनाई आहे, तसेच होटेलच्या ठिकाणी गर्दी करता येणार त्याचप्रमाणे सेवा पुरवठादार यांचे कोरोना टेस्ट किंवा लसीकरण केलेले असणे बंधनकारक आहे.
याअनुषंगाने जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी अचानक रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील “हॉटेल वृंदावन” ला भेट दिली असता, सदर हॉटेल हे चालु असल्याचे व एका ट्रव्हल्समधील प्रवासी हे टेबल सर्व्हीस घेताना आढळले. त्याचप्रमाणे याठिकाणी गर्दी सुध्दा दिसुन आली. सबब जिल्हाधिकारी यांचे निर्देशानुसार तहसीलदार रत्नागिरी, पोलीस निरीक्षक रत्नागिरी ग्रामीण, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी व अन्न व औषध प्रशासन या विभागांमार्फत सदर हॉटेलवर संयुक्त कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये सदर होटेलमध्ये टेबल सर्व्हीस देणे, सेवा पुरवठादार यांची कोरोना टेस्ट केलेली नसणे, कोरोना नियमावलींचे उल्लघंन केल्याने तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तात्काळ हॉटेल वृंदावन हे पुढील आदेशापर्यत सीलबंद केले आहे, तसेच कोरोना नियमावलींचा भंग केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने सदर होटेल आस्थापनावर रक्कम रुपये 13000/- इतकी दंडात्मक कारवाई केली आहे.
सदर हॉटेल सील करण्याच्या कारवाईत तहसीलदार रत्नागिरी श्री शशिकांत जाधव यांच्यासोबत मंडल अधिकारी पाली श्री सुरेंद्र कांबळे, मंडल अधिकारी रत्नागिरी श्री विलास सरफरे, तलाठी श्री अरविंद शिंदे, महसुल सहायक रवी खाके व कोतवाल श्री डिचोलकर यांनी सहभाग घेतला आणि दंडात्मक कारवाई अन्न व औषध विभागामार्फत श्री पाचपुते, निरीक्षक अन्न व औषध प्रशासन यांच्या पथकाने केली. याशिवाय याठिकाणी मुंबईला जाणारी एक ट्रव्हल्स काही प्रवाशांसह उभी होती. सदर ट्रव्हल्सवर उपप्रादेशीक अधिकारी व पोलीस विभागामार्फत रात्री उशीरापर्यत कारवाई चालु होती. या अनुषंगाने तालुक्यातील सर्व हॉटेल आस्थापनाना/सेवा पुरवठादारांना तालुका प्रशासनातर्फे पुन्हा एकदा सुचना देण्यात येत आहेत की, हॉटेल व रेस्टारंट यांनी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या कालावधीतच फक्त घरपोच सेवा द्यावयाची आहे. तसेच हॉटेल सेवापुरवठादार/डिलीव्हरी बॉय/इतर कोणामार्फत उदा. Swiggy, unbox इ मार्फत होम डिलीव्हरी देत असतील तर सदर डिलीव्हरी करणार्यांरचे कोरोना चाचणी (जास्तीत जास्त 10 दिवस अलीकडील) निगेटीव्ह अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे याबाबत आस्थापनानी सुध्दा खात्री करावी. हॉटेल आस्थापनाच्याठिकाणी कोरोना नियमावलींचे पालन केले जाईल याची दक्षता घेण्यात यावी असे सर्व होटेल आस्थापना व सेवा पुरवठादार यांना तहसीलदार शशिकांत जाधव आवाहन केले आहे