( प्रतिनिधी / रत्नागिरी )
रत्नागिरी शहरालगतच्या कुवारबाव उत्कर्ष नगर येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना 9 जानेवारी रोजी घडली. प्रवीण सदाशिव तांबे ( ५०) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण सदाशिव तांबे हे ९ जानेवारी रोजी रात्रीचे जेवण आटोपून आपल्या शेजाऱ्या सोबत गप्पा मारत बसले होते. गप्पा मारत असताना प्रवीण यांना अचानक चक्कर आल्याने ते जमीनीवर पडल्याने शेजाऱ्यांनी त्यांचेवर घरगुती उपचार केले. त्यांना अधिक उपचारासाठी परकार हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. परकार हाॅस्पीटल तेथे प्रवीण तांबे यांच्यावर उपचार सुरू असताना तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्रवीण याना मयत घोषीत केले. याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.