( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील दाभोळे घाटात नागमोडी वळणावर विरुध्द दिशेला जाऊन अपघात केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष अमृता गिरीगोसावी (37, गडहिंग्लज, कोल्हापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष गिरीगोसावी हा आपल्या ताब्यातील ट्रकमधून जिप्सम भरुन घेऊन जयगड ते दालमिया याद्वाड कर्नाटक असा घेऊन जात होता. त्याच्या ट्रकमध्ये सिमेंटची पोती होती. रत्नागिरी कोल्हापूर मार्गाने जात असताना दाभोळे घाटातील नागमोडी वळणाकडे दुर्लक्ष करत विरुध्द दिशेला जाऊन रेलिंग तोडून 50 फुट रस्ता सोडून दगडावर आदळला. यामध्ये स्वत:च्या दुखापतीस कारणीभूत ठरला शिवाय ट्रकमधील जिप्समच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी सुभाष गोसावी याच्यावर भादविकलम 279, 337, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.