( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
मार्लेश्वरावर असलेल्या अपार श्रध्देपोटी रत्नागिरीतील पानवल येथील तरुण गेली 2 वर्षे पानवल ते मार्लेश्वर असा पायी प्रवास करत आहेत. यावर्षीही येथील 25 ते 30 तरुण एकत्रित मार्लेश्वरच्या दर्शनाला निघाले आहेत.
पानवल येथील हे तरुण रविवार 8 जानेवारी रोजी घरातून शिदोरी आणि पाणी बॉटल आवश्यक सामान घेऊन निघाले आहेत. आज 9 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ते मार्लेश्वरला पोहोचणार आहेत. थंडी आणि उनाची पर्वा न करता हर तरुण पायी प्रवास करत आहेत. सावलीच्या ठिकाणी नाश्ता करण, दुपारचं जेवण आणि रात्री निवारा पाहून विश्रांती करण असा त्यांचा प्रवास सुरू आहे. आज मार्लेश्वरला पोहोचल्यानंतर स्वयंभू मार्लेश्वरचे दर्शन घेऊन हे तरुण परतीच्या प्रवासाला लागणार आहेत. त्यानंतर पुन्हा दोन दिवस त्यांचा प्रवासात जाणार आहे.