( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी ते पावस या मार्गावरील गोळप उतारावर अज्ञात वाहनाने धडक देऊन केलेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. रामप्रसाद भागीराम चौधरी (वय ५२, रा. गोळप) असे जखमीचे नाव आहे. याची नोंद रत्नागिरी पोलिस ठाण्यात झाली.
पोलिसांनी दिलेली माहिती, रत्नागिरी येथील प्रशांत अनंत यादव यांनी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यामध्ये यासंदर्भात फिर्याद नोंदवली आहे. ५ जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. गोळप येथील सुनील लिमये यांच्या आंबा बागेमध्ये राखणीसाठी असलेले नेपाळी कामगार रामप्रसाद भागीराम चौधरी (वय ५२, रा. गोळप ) हे त्यांच्याकडेच राहतात. ते रत्नागिरी पावस या मार्गावर गोळप उतारावर चालत असताना त्यांना अज्ञात वाहनाने ठोकर देऊन दिली. याबाबत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.