( रत्नागिरी / के. कांबळे )
रत्नागिरीतील दोन सख्ख्या बहिणीनी सुवर्णाक्षरात लिहावी अशी कामगिरी केली आहे. नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा 2022-23 योगासन क्रीडा प्रकारात रत्नागिरीच्या पूर्वा किनरे व प्राप्ती किनरे या दोन सख्ख्या बहिणीनी दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. महाराष्ट्र राज्य आर्टिस्ट पेअर प्रकारात सुवर्णपदक मिळवून या सख्ख्या बहिणींनी सुवर्ण कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये संघ प्रशिक्षक रणवीर अशोक सावंत व संघ व्यवस्थापक म्हणून गौरव बापूसाहेब आंब्रे यांनाही सन्मानित करण्यात आले.
या दोन्ही बहिणींनी यापूर्वीही जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत अनेक पदके पटकावली आहेत. त्यांच्या या यशासाठी जिल्हा क्रीडा मार्गदर्शक रवीभूषण कुमठेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दोघींचे ही सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या या यशासाठी जिल्हा क्रीडा मार्गदर्शक रवीभूषण कुमठेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.