कोकणची माणसं ही संस्कारक्षम असल्याने प्रामाणिक आहेत . येथे सर्व जाती धर्मामध्ये सलोखा आणि आपलेपणा आहे . देशात कोठेही गेलात तरीही महाराष्ट्र आणि त्यातही कोकणला जेवढे महत्व आहे तेवढे अन्य कोणालाही नाही . पिढी घडविण्याचे काम आणि त्यांच्यावर संस्कार करण्याचे महान कार्य व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाने केले आहे असे गौरवोद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आणि चिपळूणचे सुपूत्र ॲड . ओवेस पेचकर यांनी काढले.
व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. ओवेस पेचकर हे बोलत होते . यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदि मान्यवर उपस्थित होते. संस्थेतर्फे ॲड. ओवेस पेचकर यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देवून सन्मान करणात आला . यावेळी बोलताना ॲड . पेचकर पुढे म्हणाले की, मुंबई गोवा महामार्गासाठी आपण उच्च न्यायालयात जनहित याचिकेच्या माध्यमातून लढा देत आहोत त्याला आता यश येताना आपल्या सर्वांना दिसत आहे . चिपळूणला जो महाप्रलय आला त्यावर देखील आपण जनहित याचिका दाखल केली होती . त्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य उपाययोजना झाल्याने गतवर्षी चिपळूणची पुरापासून मुक्तता झाली . आपणही सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच होतो . मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण येथपर्यंत पोहचलो आहोत . आपण देखील जिद्द आणि चिकाटी सोडू नका असे आवाहन अखेरीस त्यांनी विद्यार्थ्यांना केले . वैविध्यता असलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे त्यांनी मनापासून कौतूक केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी केले .
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !