अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तौक्ते चक्रीवादळ निर्माण झाले. या वादळामुळे रत्नागिरी जिह्यात जागोजागी महावितरणचेही अतोनात नुकसान झाले. या वादळाची पुर्वसुचना असल्याने विज पुरवठा सुरू करण्यासाठी मुख्य अभियंता श्री. देवेंद्र सायनेकर यांनी सर्व अभियंता यांच्यासह जागोजागी नियोजन केल्याने विज पुरवठा दोन दिवसात सुरळीत झाला. महावितरण कामगिरीचा आता विविध ठिकाणी गौरव केला जात आहे. असेच काम देवरूख येथील रिजारिओ रिचडर्स यांच्या मार्गदर्शनाखाली करणाऱ्या वीज अभियंता आणि कामगारांचा सन्मान सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी भेट वस्तू देऊन केला.
संगमेश्वर तालुक्यात चक्रीवादळामुळे ठिक ठिकाणी वृक्ष कोसळल्याने विज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्या तुटल्या व पोल पडले यामुळे विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या वायरमने जिव धोक्यात घालून विज पुरवठा सुरळीत केला. या कामगिरी बदल या सर्व वायरमनचा सत्कार करण्यात आला. यावेळी अभियंता रिजारिओ रिचडर्स देवरुख शहरचे गुरुप्रसाद मोरे ग्रामीणचे धीरज कुंभार आणि कोसुंबचे एम एस चाचे यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते सावरकर चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष राजु वनकुंद्रे अनिल साळवी आरोग्य सेविका आर आर कदम उपस्थित होते.
यावेळी महावितरण व नागरिक यामधील दुवा म्हणून काम पाहणारे विजदूत अमेय लिमये यांनी ही वायरमनचे कौतुक केले. महावितरणचे कार्य अधिक सुरळीत होण्यासाठी महावितरण अधिकारी, व्यापारी, पत्रकार व नागरिक यांचा सोशल मीडिया ग्रुप तयार करावा असे आर्ते यांनी सांगितले. नागरिकांच्या सहकार्याने विज पुरवठा लवकर सुरळीत होण्यास मदत झाली. नागरीकांनी यासाठी चांगले सहकार्य केले असे रिजारिओ रिचडर्स यांनी सागितले.
महावितरण ही कंपनी वीज ग्राहकाच्या हितासाठीच कार्यरत असते, आणि प्रत्येक संकटाच्या वेळी प्रत्येक कामगार जीवाचे रान करून आधी वीज पुरवठा सुरळीत करणे ही स्वतःची जबाबदारी मानतो आणि हे सर्व अभियंते आणि वीज कामगार हीच महावितरणची संपत्ती आहे असे गौरवोद्गार मुख्य अभियंता श्री देवेंद्र सायनेकर यांनी काढले आहेत.