( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शहरातील मारुती मंदिर के.सी. जैन नगर येथून पार्किंगमधील दुचाकी चोरीला गेल्याची घटना 1 जानेवारी रोजी रात्री 9.15 ते 2 जानेवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद शिरीष सावंत (63, सेवानिवृत्त, एसटी डेपो विभागीय कार्यालय, लेखाकार, पारसदर्शन, के. सी. जैननगर, मारुतीमंदिर रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष सावंत यांनी आपल्या सोसायटीच्या पार्किंमध्ये अॅक्टीव्हा (एमएच 08 एएस 5344) ही दुचाकी लावून ठेवली होती. 1 जानेवारी ते 2 जानेवारी दरम्यान ही अॅक्टीव्हा चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञातावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.