(मुंबई)
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी लोकप्रिय मलिका ठरली आली आहे. ही मालिका घराघरात आवर्जून पहिली जाते. सर्वात जास्त काळ चालणाऱ्या शोमध्ये या मालिकेची अव्वलस्थानी वर्णी लागते. 28 जुलै 2008 रोजी सोनी सबवर ही मालिका प्रसारित होण्यास सुरुवात झाली. या मालिकेने सगळ्यात जास्त दिवस चालणारी मालिका म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे.
परंतु सध्या शोला उतरती कळा लागली आहे. कारण या मालिकेतील अनेक कलाकारांनी या मालिकेला रामराम ठोकलाआहे, त्यामुळं प्रेक्षकही नाराज होत त्यांनी मालिकेकडे पाठ फिरवली आहे. जेव्हा सर्वांची लाडकी दिशा वकानीनं हा शो सोडला, तेव्हापासून अनेकांचा हा शो पाहण्याचा रस कमी झाला आहे.
दिशाच्या पाठोपाठच काही महिन्यांपूर्वी जेठालालचे परम मित्र म्हणून ओळखले जाणारे तारक म्हणजेच शैलेश लोढा यांनीही या शोला पूर्ण विराम दिला आहे. तसेच निधी भानुषालीनेही हा शो सोडला आहे.
अशा परिस्थीत मालिकेसाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या व मालिकेचे दिग्दर्शक करणारे मालव राजदा यांनीही शो सोडल्याची माहिती समोर येत आहे. राजदा यांनी या शोसाठी महत्वाची कामगिरी केली. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. मालव यांनी 15 डिसेंबरला शेवटचे शूट पूर्ण केलं आहे, अशी माहिती मिळातआहे. मालव यांचे मालिकेच्या प्रोडक्शन हाऊससोबत संबंध बिघडल्यानं त्यांनी हा शो सोडला असल्याच्या चर्चा आहेत. परंतु त्यांनी याबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.