(प्रतिनिधी / रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातील आयटीआय मधील जीर्ण झालेल्या इलेक्ट्रानिक्स सामग्रीचा लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये संगमेश्वर, आयटीआय, रत्नागिरी आयटीआय आणि मंडणगड आयटीआय या कार्यालयांचा समावेश आहे. यासाठी निविदा सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संगमेश्वर आयटीआय मधील सामग्रीचा होणार या दिवशी लिलाव
संगमेश्वर येथील आयटीआय मधील इलेक्ट्रॉनिक्स सामुग्री/यंत्रसामुग्री/निर्लेखित केलेली (वापरून खराब झालेली) हत्यारे व अवजारे संयंत्रे यंत्रसामुग्री / एम.एस. स्कप /पत्रा स्कप / पितळी स्कप (उपलब्धतेनुसार) तांब्याचे स्क्कप (उपलब्धतेनुसार) ऍल्युमिनियम स्कप (उपलब्धतेनुसार ) इतर लाकडांचे तुकडे यांची कोटेशन पध्दतीने विक्री करावयाची आहे. यासाठी खरेदीदारांनी आपले देकार बंद पाकीटातून प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर, जि. रत्नागिरी यांच्या कार्यालयात 5 जानेवारी 2023 रोजी दु. 3.00 वाजेपर्यत साहित्याची समक्ष पाहणी करून आणून द्यावीत असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर, जि. रत्नागिरी यांनी कळविले आहे.
रत्नागिरी आयटीआय मधील सामग्रीचा होणार या दिवशी लिलाव
नाचणे रोड, रत्नागिरी यांचे कार्यालयातील निर्लेखित केलेले संगणक / प्रिंटर व इतर तदअनुषंगिक आय.टी. उपकरणे / इलेक्ट्रॉनिक्स यंत्रसामुग्री / यंत्रसामुग्री / निर्लेखित केलेली (वापरुन खराब झालेली) हत्यारे व अवजारे संयंत्रे यंत्रसामग्री / एम.एस.स्कप / पत्रा स्कप / पितळी स्कप (उपलब्धतेनुसार) / तांब्याचे स्कप (उपलब्धतेनुसार) / ऍल्युमिनियम स्कप (उपलब्धतेनुसार) / इतर लाकडाचे तुकडे / लोखंडी भुसा यांची कोटेशन पध्दतीने विक्री करावयाची आहे. यासाठी इच्छुक खरेदीदारांनी आपले देकार बंद पाकीटातून प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था-नाचणे रोड, रत्नागिरी यांचे कार्यालयात 09 जानेवारी 2023 रोजी दु. 3 वाजेपर्यंत साहित्याची समक्ष पाहणी करुन आणून दयावीत असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था- नाचणे रोड, रत्नागिरी यांनी कळविलेले आहे.
मंडणगड आयटीआय मधील सामग्रीचा होणार या दिवशी लिलाव
औदयोगिक प्रशिक्षण संस्था मंडणगड रत्नागिरी या कार्यालयातील विविध प्रकारच्या निर्लेखित जडसंग्रह साहित्याची दरपत्रक पध्दतीने विक्री करावयाची आहे. साहित्य ज्या खरेदीदारास विकत घ्यावयाचे आहे त्यांनी या कार्यालयात 15 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत दरपत्रक सिलबंध लिफाफ्यात पाठविण्यात यावीत. निविदेच्या बंद लिफाफयावर स्वच्छ अक्षरात लॉट घेणाऱ्यांचे संपुर्ण नांव, पत्ता नमूद करावा. निविदा दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता उघडण्यात येतील. 15 जानेवारी 2023 नंतर आलेल्या निविदाचा स्विकार केला जाणार नाही. सदर विक्री करावयाचे निर्लेखित जडसंग्रह साहित्य या कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत 10.30 ते 5.00 वाजेपर्यंत पाहता येईल. ज्यांचा दर मंजूर होईल त्यांना ताबडतोब योग्य रक्कम भरुन साहित्य स्वखर्चाने घेवून जावे लागेल. कोणतीही निविदा राखून ठेवण्याचा विक्री रदद करण्याचा अधिकार कार्यालय प्रमुखांना राहील. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा नाकारणेंचा अधिकार प्राचार्यांनी राखून ठेवले आहेत, असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंडणगड यांनी कळविले आहे.