(गुहागर / प्रतिनिधी)
गुहागर तालुक्यातील किर्तनवाडी येथे घराचे बांधकामावर पाणी मारताना पाय घसरुन पडल्याने प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. पांडुरंग सखाराम रेमजे (५६, किर्तनवाडी, गुठागर रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग रेमजे यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. देवपाट येथे मोहन मावे यांच्या घराचे बांधकामाच्या ठिकाणी ते कामाला होते. घराचे काम करताना सकाळी ८.३० वा. बादलीतून पाणी घेऊन जोत्याच्या बांधकामावर मारत होते. पाणी मारताना ज्योत्यावरून पाय घसरुन पडल्याने ते खाली पडले, त्यांना गंभीर दुखापत झाली. इतर कामगारांच्या मदतीने त्यांना ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून पांडुरंग रेमजे यांना मयत घोषित केले.
याप्रकरणी गुहागर पोलीस वण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.