( मंडणगड / प्रतिनिधी )
मंडणगड पोलीस ठाणे हद्दीमधील लाटवण-दापोली रोड वरील 31 डिसेंबरच्या मध्यरात्री घाटातून खवले मांजराच्या खवल्यांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली.
खेड पोलीस ठाणे येथील पो.उप.निरीक्षक श्री. हर्षद हिंगे यांनी पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मंडणगड यांचेसह, खेड व मंडणगड पोलीस ठाणे यांचे संयुक्तिक पथक तयार केले व या पथकासह मंडणगड पोलीस ठाणे हद्दीमधील लाटवण-दापोली रोड वरील घाटामध्ये सापळा रचण्यात आला. अगदी थोड्याच वेळात, या घाटातून एका दुचाकीवरून ३ इसमांना संशयितरित्या जाताना पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली. यावेळी त्यांच्या ताब्यात असलेल्या एका पिशवीत खवले मांजराचे ४.३७२ कि. वजनाचे खवले” आढळून आले. यावेळी तिथे आणखीन एक संशयित व्यक्ती चारचाकी वाहनातून तेथे आल्याचे पाहून पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस पथकाला पाहताच अंधाराचा फायदा घेऊन हा इसम आपल्या वाहनासह तेथून फरार झाला आहे.
या कारवाई मध्ये ३ इसमांना, वन्य जीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम २ ९ ३९ (२) ४८, ४९ व ५१ प्रमाणे मंडणगड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून, दुचाकी व मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यामधील वन्यजीवी प्राण्याची (खवले मांजराची) हत्या/शिकार कोठे झाली आहे? व अन्य फरार व्यक्तीला शोधण्याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस उप निरीक्षक, श्री. हर्षद हिंगे, खेड पोलीस ठाणे, पोकों / ४२ श्री. मोरे, पोलीस मुख्यालय, रत्नागिरी, पोकों / १३१५ श्री. जोगी, खेड पोलीस ठाणे, पोकों / १२९१ श्री. कडू, खेड पोलीस ठाणे, पोकों / १३२३ श्री. गीते, खेड पोलीस ठाणे, पोकों / ११९९ श्री. झेंड, खेड पोलीस ठाणे, पोकों / ५०२ श्री. माने, मंडणगड पोलीस ठाणे, श्री. अनिल राजाराम दळवी, वनपाल, मंडणगड यांनी कामगिरी केली