(लांजा)
विद्यादीप एज्युकेशन संस्था, विक्रोळी संचालित विद्यादीप इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, लांजा व देवांग नर्सिंग स्कूल आयोजित भव्य शालेय अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा दि. 23 व 24 डिसेंबर रोजी विद्यादीप इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर संपन्न झाल्या. या क्रिकेट स्पर्धेमध्ये तालुक्यातील हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी आपला प्रवेश नोंदवला होता. यामध्ये 40 पेक्षा जास्त संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेमध्ये हायस्कूल गट व कनिष्ठ महाविद्यालय गट असे दोन विभाग होते. यामध्ये हायस्कूल विभागात भांबेड हायस्कूलच्या प्लेयर इलेव्हन या टीमने विजेता पदावर नाव कोरले तर एकनाथ राणे इंग्लिश माध्यम स्कूल च्या सुपर किंग टीमने उपविजेता पद मिळविले. या मालिकेत सर्वोत्तम फलंदाज ओम नेमन, सर्वोत्तम गोलंदाज वेदांत चव्हाण, सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू (सामनावीर) गौरव गांगण यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
कनिष्ठ महाविद्यालय व आयटीआय विभाग यामध्ये श्रीराम विद्यालय व तू. पु. शेट्टे कनिष्ठ महाविद्यालय वेरवली या कॉलेजचा संघ विजेता तर प्रतापराव माने विद्यालय भांबेड या कॉलेजचा संघ उपविजेता ठरला . या मालिकेत सर्वोत्तम फलंदाज आदित्य तटकरे, सर्वोत्तम गोलंदाज विशाल नारायण. सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू प्रतीक मेस्त्री या सर्वांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या दोन्ही विभागांमध्ये प्रथम विजेत्याला ३३३३/- तर उपविजेता यांना १५५५/- अशी रोग रक्कम सर्टिफिकेट ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटना समारंभास उपस्थित सर्व लांजा पंचायत शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी बंडगर, उपनगराध्यक्षा पूर्वा मुळे, चेअरमन एस एस लाखन, नगरसेवक मुळे, नगरसेवक राजू हळदणकर आणि संस्थेचे पदाधिकारी व विद्यादीप परिवार उपस्थित होता.
याच स्पर्धेच्या समारोपप्रसंगी संस्थेचे चेअरमन एस एस लाखन, शांताराम उर्फ दादा लाखन, लांजा तालुक्यातील कुस्तीपटू आर्या मोरे, विद्यादीप कॉलेजची पहिल्या बॅचची विद्यार्थिनी आणि वेरळ ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध निवडून आलेली सदस्या समीक्षा पाताडे, मुख्याध्यापक तालुका संघाचे अध्यक्ष, खावडी हायस्कूलचे मुख्याध्यापक देसाई, सचिव रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, नवलादेवी खानवली हायस्कूलचे पाटकर, जावडे हायस्कूलचे मुख्याध्यापक कांबळे, गोविळ गावचे सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाखन, प्रकाश लाखन, रमेश लाखन, संस्थेचे सीईओ अभिषेक लाखन, दाजी गडहिरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज नेवरेकर आणि विद्यादीप परिवार उपस्थित होते.
या स्पर्धेच्या नियोजनासाठी कॉलेजचे प्र. प्राचार्य अमोल जाधव, कांबळे, शेळके आणि विद्यादीप परिवार, सर्व विद्यार्थी तसेच सुहास गराटे यांनी मेहनत घेतली. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालनासह आभार श्री जाधव यांनी केले.