( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शहरातील शिवाजी बस स्टॉपजवळ गुरुवार 29 डिसेंबर रोजी सकाळी तीन वाहनांचा अपघात झाला होता. या अपघातप्रकरणी होंडा अमेज गाडी (एमएच 08 एजी 2183) या गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक आनंद जाधव (क्षितीजा अपार्टमेंट मांडवी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चारचाकीचालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद किरण शिंदे (46, एमआयडीसी मिरजोळे, मूळ निवे बुदु्रक) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर बस स्टॉपजवळ दीपक जाधव याने ओम्नी (एमएच 08 आर0184) गाडीला पाठीमागून ठोकर दिली. तसेच टोयोटा इटिऑस (एमएच 08 एजी 0360) निखिल सावंत याच्या गाडीला ठोकर दिली. धडकेत इटिऑस गाडीचे बंपर डॅश बोनेट मडगार्ड व इंजिन डॅमेज होवून डिवायडरवर आदळला. इतकी जोरदार धडक झाली. या धडकेत किरण शिंदे यांच्या हाता दुखापत झाली. किरण शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चारचाकी चालक दीपक जाधव याच्यावर भादविकलम 279, 337, 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.