(मुंबई)
कोकणात हळूहळू शेती कमी होत आहे. मात्र जंगल कमी झाले हे खरे नाही शेती कमी झाल्यामुळे गावागावात जंगल वाढत आहे आणि शेतीखालची जमीन कमी होत चालली आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कोकणातील निवडक शेतकरी नेटाने शेती करत आहेत, त्यामुळे गावागावात निवडक हिरवळ आणि शेती होत आहे. आंबा बागायतदार अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आंब्याची काळजी घेत आहेत, सुरुवातीला प्रचंड परिश्रम करून निर्माण केलेला हापूस आंबा या माकडांच्या त्रासामुळे उध्वस्त होत आहे, शेतीला होणाऱ्या माकडांच्या उपद्रवामुळे कोकणातील शेती अतिशय अडचणीत आली आहे.
शेतकऱ्यांना होणाऱ्या या माकडांच्या त्रासापासून सुटका व्हावी याकरता आवश्यक ती उपाययोजना केली पाहिजे. गरज असेल तर माकडांना भीती आणि धाक बसण्यासाठी कारवाई करण्याची अगदीच आवश्यक असेल तर मारण्याची परवानगी शासनाने दिली पाहिजे, अशा स्वरूपाची मागणी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे केली.
यावर सकारात्मक निर्णय घेण्याची घोषणा मुनगुंटीवार यांनी यावेळी केली.
यावेळी कोकण भूमी प्रतिष्ठान व कोकण बिझनेस फोरमचे संजय यादवराव यांनी सदर निवेदन दिले. तर दापोली येथे शेतकऱ्यांसाठी काम करणारे, प्रगतिशील कृषी उद्योजक विनय महाजन, माधव महाजन आणि दापोली व रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने ही अतिशय महत्त्वाची मागणी केली गेली.