(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंडची इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थिनीं कुमारी प्रांजल सुर्यकांत गोनबरे हिला चतुरंग प्रतिष्ठान चिपळूण मार्फत देण्यात येणारा “सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले सन2022/23चा पुरस्कार” प्राप्त झाला आहे .
गुरुवर्य स्व एस. वाय. गोडबोले गुरुजी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार रत्नागिरीतील निवडक शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येतो. रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे 51 शाळांमधील 197 विद्यार्थ्यांचा मुलाखतीचा कार्यक्रम 24, 25 डिसेंबर 2022रोजी पार पडला, त्यामध्ये 29 विद्यार्थ्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
बळीराम परकर विद्यालयातील इयत्ता दहावीच्या वर्गातील तीन विद्यार्थिनी या मुलाखतीसाठी प्रविष्ठ झाल्या होत्या. त्यामध्ये कुमारी कादंबरी संजय चौधरी, कुमारी गौरी राजेश तोडणकर, व कुमारी प्रांजल सुर्यकांत गोनबरे त्या पैकी कुमारी प्रांजल सुर्यकांत गोनबरे हिची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ही विद्यार्थिनी अभ्यासाबरोबर क्रीडा, अभिनय, कथक्क नृत्यामध्ये मध्ये पारंगत आहे. या वर्षीच्या जिल्हास्तरीय तायकोंदो स्पर्धेसाठी सुद्धा निवड झाली होती. या गुणी विद्यार्थिनीचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्वत्र कौतुक होत आहे.
कुमारी प्रांजल हिने प्रशालेची पुरस्कार मिळविण्याची गेल्या कित्येक वर्षाची परंपरा यावेळी कायम राखली. हा पुरस्कार तीला 15 जानेवारी 2023 रोजी प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप असे आहे रुपये 1हजार रोख, रुपये 500 ची पुस्तके, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे आहे. या पुरस्कारासाठी तिला प्रशालेतील विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. रमेश पाटील, मुख्याध्यापक श्री. नामदेव वाघमारे, पर्यवेक्षक श्री. नितिन मोरे, तसेच तीचे आई- वडील तसेच तिला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.
कुमारी प्रांजल सुर्यकांत गोनबरे हिला सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार मिळाल्याबद्दल मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. सुनिल ऊर्फ बंधू मयेकर, तसेच सचिव श्री. विनायक राऊत यांनी तीचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.