आयुर्वेद शिक्षण मंडळ, पुणे संचलित अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातर्फे कोकणातील दुर्गम भागात मोफत सर्वरोग निदान चिकित्सा शिबीरांना 18 डिसेंबर पासून प्रारंभ झाला असून ही शिबीरे 25 डिसेंबर 2022 पर्यंत सुरु राहतील, असे मंडळाचे सचिव डॉ. म.ह. परांजपे यांनी कळविले आहे.
या शिबीरामध्ये शालेय विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, वयोवृध्द स्त्री-पुरुष यांच्यासाठी विशेष तपासणी, संधिवात, उच्च रक्तदाब, मधुमेह, त्वचारोग, स्वाईन फ्ल्यू इत्यादि आजारांची तपासणी व उपचार आवश्यकतेनुसार कार्डिओग्राम काढणे, मुळव्याध आणि भगंदर यावर विशेष सल्ला आणि उपचार करण्यात येणार आहेत. याखेरीज उपचारांविषयी मार्गदर्शन, त्याचप्रमाणे डोळे तपासणी व मोफत चष्मेवाटप करण्यात येते. योग आणि प्राणायम त्याबाबत मार्गदर्शन, लहान मुलांसाठी कृमी तसेच जंत यावर औषधे आणि रक्तवर्धक, शक्तीवर्धक औषधांचे वाटप शिबीरात करण्यात येत आहे.
मोफत सर्वरोग निदान चिकित्सा शिबीर गेली 30 वर्षांपासून दरवर्षी आयोजित करण्यात येतात. यंदाचे शिबीर रत्नागिरी जिल्ह्यातील कोंडसर बुद्रुक, आडिवरे, कशेळी, भाट्ये, कुर्धे, गावडे आंबेरे, पावस, गोळप या गावांमध्ये होत आहे. 18 डिसेंबर पासून सुमारे 2 हजार 619 लाभार्थ्यांनी शिबीराचा लाभ घेतला आहे. शिबीरामध्ये आयुर्वेद शिक्षण मंडळाच्या विश्वस्त डॉ. सौ. मीरा परांजपे तसेच अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, पुणे, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि., रत्नागिरी, आणि कोलंबस हेल्थ केअर, पुणे या संस्थाही सहभागी आहेत.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !