( रत्नागिरी / प्रतिनिधी )
चारचाकी गाडीने दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना 21 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातप्रकरणी महिंद्र लोगान कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश भागण्णा खेत्री (आदर्शनगर, साई मंदिरजवळ, कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद योगेश फुलचंद मगर (28, रा. मूळ उस्मानाबाद, सध्या पाली) याने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश मगर हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन पाली ते रत्नागिरीच्या दिशेने जात होता. याचवेळी मागून येणाऱ्या महिंद्रा लोगान कारने हातखंबा येथे मगर याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात मगर याला दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. त्याने ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महिंद्रा लोगान कार चालक जगदीश खेत्री याच्यावर भादविकलम 279, 337, 338, मोटर वाहन कायदा कलम 184, 134/177 नुसार गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.